Elec-widget

6,6,6,6... आणि षटकार मोजतच रहा, रोहितचा विक्रम मोडला!

6,6,6,6... आणि षटकार मोजतच रहा, रोहितचा विक्रम मोडला!

ICC Cricket World Cup 2019 : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने 70 चेंडूत 148 धावांची तुफान खेळी केली. या खेळीत त्याने षटकारांचा पाऊस पाडत विश्वविक्रम केला.

  • Share this:

मँचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत मँचेस्टरवर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या वादळी खेळीने अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर उभा केला. एकवेळ इंग्लंडच्या 30 षटकांत 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. त्यानंतर जो रूट आणि इयॉन मॉर्गन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॉर्गनने तर चक्क 71 चेंडूत 148 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता. मोहम्मद नैबने ही जौडी फोडली. नैबने रूटला रहमतकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मॉर्गनने एक षटकार मारला आणि नैबच्याच गोलंदाजीवर रहमतच्या हाती झेल देऊन तो बाद झाला.अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानच्या गोलंदाजीची तर मॉर्गनने अक्षरश: पिसे काढली. राशिद खानच्या 9 षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या. मॉर्गनने त्याच्या 70 चेंडूंच्या खेळीत तब्बल 17 षटकार मारले. त्याने हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकून विश्वविक्रम आपल्या नावावर केला. एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा यापूर्वीचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल तीन द्विशतके करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्माने 2013 मध्ये एका सामन्यात 16 षटकार मारले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 158 चेंडूत 209 धावांची खेळी केली होती.

Loading...

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...