World Cup 2019 मध्ये रोहितच हिटमॅन, पाहा टॉप 5 फलंदाज!

ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताचा हिटमॅन रोहित शर्माने 4 शतके केली असून सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं सेमीफायनलला धडक मारली आहे. भारताच्या या कामगिरीत हिटमॅन रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यानं 7 सामन्यात 90 च्या सरासरीनं 544 धावा करत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं आहे. यात 4 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

रोहित शर्मानंतर बांगलादेशच्या शाकिबचा क्रमांक लागतो. त्यानं 7 सामन्यात त्याने 108 च्या सरासरीने 542 धावा केल्या असून यात 4 अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे. पाकविरुद्धच्या सामन्यात तो रोहितला मागं टाकू शकतो.

गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरने 8 सामन्यात 73 च्या सरासरीनं 516 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकं आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे.

चौथ्या क्रमांकावर अॅरॉन फिंच असून त्यानं 8 सामन्यात 63 च्या सरासरीनं 504 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडचा जो रूट वर्ल्ड कप 2019 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याने 9 सामन्यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांसह 68 च्या सरासरीनं 504 धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या