World Cup : सचिनची भविष्यवाणी ठरली खरी, इंग्लंडला आधीच केलं होतं सावध पण...

World Cup : सचिनची भविष्यवाणी ठरली खरी, इंग्लंडला आधीच केलं होतं सावध पण...

ICC Cricket World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाने फिंचच्या शतकानंतर बेहरनडॉर्फ आणि स्टार्कच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला 64 धावांनी पराभूत केलं.

  • Share this:

लॉर्ड्स, 25 जून : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडला 64 धावांनी पराभूत केलं. यासह ऑस्ट्रेलियानं सेमिफायनलला धडक मारली आहे. या सामन्यात बेहरनडॉर्फने 5 तर मिशेल स्टार्कने 4 विकेट घेतल्या. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केलेली भविष्यवाणी खरी ठरली.

सचिनने इंग्लंडला सल्ला दिला होता की, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या दोन गोलंदाजांपासून सावध रहायला हवं. ते दोन्ही गोलंदाज धोकादायक ठरू शकतात. या दोघांचा सामना केला तर इंग्लंडला सामना जिंकणं सोपं जाईलं असं सचिनने म्हटलं होतं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या सामन्यापूर्वी सचिनने आस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा सामना करणं इंग्लंडला जड जाईल असं म्हटलं होतं. विशेषत: मिशेल स्टार्क आणि पेंट कमिन्स कमाल करतील असंही सांगितलं होतं.

स्टार्कने इंग्लंडविरुद्ध 43 धावा देत चार फलंदाज बाद केले. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मिशेल स्टार्कने 9 विकेट घेतल्या आहेत.वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याने इंग्लंडच्या जो रूट, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स या दिग्गजांना बाद करून फलंदाजीला खिंडार पाडलं. तर दुसऱ्या बाजूने बेहरनडॉर्फच्या दणक्यातून इंग्लंडला अखेरपर्यंत सावरता आलं नाही. त्यामुळे त्यांचा डाव 44.4 षटकांत 221 धावांवर गुंडाळला.

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 221 धावांपर्यंत मजल मारता आली. बेहरनडॉर्फ आणि स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा निम्मा संघ गारद झाला. त्याने 5 गडी बाद केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्स वगळता एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. सलामीवीर जेम्स विन्सला बेहरनडॉर्फनं बाद केलं. त्यानंतर स्टार्कने जो रूट आणि इयॉन मॉर्गनला बाद करून आघाडीची फळी तंबूत धाडली. त्यानंत बेहरनडॉर्फने बेअरस्टोला बाद करून मोठा अडथळा दूर केला. बेन स्टोक्स आणि जोस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण बटलरला बाद करून स्टोईनिसने जोडी फोडली.त्यानंतर बेन स्टोक्सला 89 धावांवर स्टार्कने बाद केलं. नंतर मोईन अली, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चरला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शेवटी ख्रिस वोक्सने पेंट कमिन्सला बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. ऑस्ट्रेलियाने फिंचच्या शतकाच्या आणि वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 285 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 123 धावांची भागिदारी केली. वॉर्नरला बाद करून मोईन अलीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. वॉर्नर 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने ख्वाजासोबत अर्धशतकी भागिदारी केली. ख्वाजाला स्टोक्सने 23 धावांवर बाद केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने 116 चेंडूत 100 धावा केल्या. त्यानंतर लगेच शतक साजरं करणाऱ्या फिंचला जोफ्रा आर्चरने ख्रिस वोक्सकडं झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर आर्चर, वूड, स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

वाचा- World Cup Point Table : बांगलादेश ठरणार जायंट किलर, भारतालाही धोका

वाचा- World Cup: 'भारताकडून पराभव झाल्यानंतर आत्महत्या करावी वाटली'

वाचा-अर्जुन तेंडुलकर वर्ल्ड कपमध्ये करतोय इंग्लंडला मदत, 'हे' आहे कारण

बेस्टला अच्छे दिन येणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading