World Cup : भारत 'या' संघाविरुद्ध खेळणार भगव्या रंगाच्या जर्सीत!

World Cup : भारत 'या' संघाविरुद्ध खेळणार भगव्या रंगाच्या जर्सीत!

ICC Cricket World Cup 2019 : भारतीय संघ यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत एका सामन्यात भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे.

  • Share this:

लंडन, 20 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. चारपैकी तीन सामने भारताने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा पुढचा सामना 22 जूनला असून 27 जूनला वेस्ट इंडिज आणि 30 जूनला इंग्लंडविरुद्ध लढत होणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सामना होणार आहे.

दरम्यान भारत अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध खेळताना भगव्या रंगाची जर्सी घालण्याची शक्यता आहे. या तीनही संघांच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी लागणार आहे. भारत नक्की कोणत्या रंगाची जर्सी घालणार याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर भगव्या रंगातील जर्सीचे फोटो व्हायरल होत आहेत.आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे.

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

इंग्लंडविरुद्ध भारत आणि अफगाणिस्तानला जर्सीचा रंग बदलावा लागेल. यात इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशविरुद्ध जर्सीचा रंग एकसारखा असल्यानं पिवळ्या रंगाची जर्सी घातली होती. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघांना जर्सी बदलण्याची गरज नाही. त्यांच्या जर्सीसारखा रंग इतर कोणत्या देशाचा नाही.

World Cup : 'भगव्या रंगाची जर्सी, हा तर भाजप लाटेचा परिणाम'

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोलबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या