World Cup : VIDEO : ट्विटरवर धोनीला करत होते ट्रोल अन् त्यानं मैदानावर केली फटकेबाजी!

World Cup : VIDEO : ट्विटरवर धोनीला करत होते ट्रोल अन् त्यानं मैदानावर केली फटकेबाजी!

ICC Cricket World Cup 2019 : धोनीने त्याच्या बॅटने ट्रोलर्सना उत्तर देताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. मधल्या फळीतील फलंदाज लागोपाठ बाद होत असताना धोनीने एका बाजून डाव सावरला. त्याने 61 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने हार्दिक पांड्यासोबत 60 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारताने 250 धावांचा टप्पा पार केला. शेवटच्या षटकात फटकेबाजी करताना धोनीने दोन षटकार आणि एक चौकार मारला. शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची परंपरा त्याने कायम ठेवली. थॉमसच्या चेंडूवर त्याने षटकार मारला.

सामन्यादरम्यान त्याच्या फलंदाजीवरून टीका करण्यात येत होती. धोनी फलंदाजीला आला तेव्हा भारताच्या 4 बाद 140 धावा झाल्या होत्या. त्याने सुरुवातही संथ केली. तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट 50 पेक्षा कमी होता. त्यावेळी सोशल मिडियावर धोनीच्या खेळावर टीका करण्यास सुरुवात झाली. पण शेवटच्या षटकात धोनीने फटकेबाजी करून सर्वांना उत्तर दिलं.

धोनीने पहिल्यांदा कर्णधार विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी 40 धावांची भागिदारी केली. त्यानंतर पांड्यासोबत अर्धशतकी भागिदारी करून संघाला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी करताना धोनीने पहिल्या 45 चेंडूत 26 धावा केल्या. मात्र शेवटच्या 16 चेंडूत 30 धावा काढल्या.

धोनीने 59 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. हे त्याचं एकदिवसीय सामन्यातील 72 वं अर्धशतक आहे. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करण्यात तो तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या आधी सचिन (96) आणि द्रविड (83) यांचा क्रमांक लागतो.

Loading...

वाचा- गेली 23 वर्ष भारत 'या' संघाविरुद्ध अपराजीत राहिला; आज काय होणार?

वाचा- सामन्याआधीच भारतानं इंग्लंडला दिला दणका, हिसकावून घेतले पहिले स्थान

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...