रसेलच्या त्या कृतीवरून वर्ल्डकपमध्ये वाद, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने घेतला आक्षेप

रसेलच्या त्या कृतीवरून वर्ल्डकपमध्ये वाद, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने घेतला आक्षेप

दुखापतीने त्रस्त असेलेला रसेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुन्हा पुन्हा मैदानाबाहेर गेला.

  • Share this:

नॉटिंगहम, 06 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरी आणि उस्मान ख्वाजा यांना बाद केलं. रसेलनं 41 धावा देत या 2 विकेट घेतल्या. दरम्यान त्याला त्रास होत असल्याने मैदानातून बाहेरही जावं लागलं. गुडघा आणि खांद्याच्या दुखापतीने गेल त्रस्त आहे.

रसेल मैदानातून बाहेर गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉने सवाल केला आहे. जर तो दुखापतीनंतरही मैदानात येत असेल तर त्याला पुन्हा पुन्हा बाहेर जाण्याची परवानगी का दिली असा प्रश्न वॉने विचारला आहे.

आयीपीएलमध्ये रसेलच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सामन्यानंतर रसेलच्या पायाला मसाज केला जातो. तो सामन्यासाठी पूर्ण तंदुरूस्त नसतानाही संघासाठी खेळत आहे. आपल्या दुखापतीबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, गेल्या दोन महिन्यांपासून या दुखापतीने त्रास होत आहे. यासाठी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 9 विकेट पडल्यानंतर मी त्यावर उपचार घेण्याचा विचार केला होता.

एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना रसेलला दुखापतीचा त्रास जास्त जाणवतो. यासाठी तो टी 20 क्रिकेट सामने खेळतो. 2018 मध्ये त्याने फक्त एकच एकदिवसीय सामना खेळताना तीन षटके गोलंदाजी केली आहे.

फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नसली तरी रसेलनं या सामन्यात 11 चेंडूत 15 धावा केल्या. यात त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.


वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 12:17 PM IST

ताज्या बातम्या