World Cup : सर्फराजला अटक करण्याची मागणी, पाकिस्तानात दाखल झाला खटला!

World Cup : सर्फराजला अटक करण्याची मागणी, पाकिस्तानात दाखल झाला खटला!

ICC Cricket World Cup भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार सर्फराजवर अनेक आरोप करत खटला दाखल करण्यात आला.

  • Share this:

लंडन, 22 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाची कामगिरी निराशाजनक अशीच राहिली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर तर पाकच्या संघावर आभाळ कोसळल्यासारखंच झालं आहे. चाहतेच काय पण त्यांच्या माजी क्रिकेटपटूंनीसुद्धा त्यांना सुनावलं आहे. सोशल मीडियावर पाकचा कर्णधार सर्फराज अहमदला ट्रोल करण्यात आलं आहे. आता त्याच्या विरोधात पाकिस्तानच्या एका वकीलाने खटला दाखल केला आहे. त्याने देशाला लाज घालवणाऱ्या सर्फराजला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सर्फराजवर अनेक आरोप लावण्यात आले आहेत.

भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात सर्फराज अहमद जांभई देत होता हेसुद्धा वकीलाने त्याच्या आरोपात घातलं आहे. सर्वात मोठ्या पराभवाने देशाची मान खाली गेली आहे आणि कर्णधार म्हणून सर्फराज अहमद मुख्य आरोपी आहे. याबाबत पाकिस्तानातील पत्रकार साज सादिकने माहिती दिली आहे. साज सादिकने ट्विटरवर म्हटलं आहे की, सर्फराजविरोधात ओकारातील वकीलाने खटला दाखल केला आहे.

पाकिस्तानला भारताविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाकच्या संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. संघाच्या पराभवानंतर नाराज झालेल्या चाहत्यांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली होती. एका व्हिडिओत कर्णधार सर्फराज अहमदवर चाहत्याने बोचरी टीका केल्याचंही बघायला मिळालं. याशिवाय माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सर्फराजला बिऩडोक म्हटलं होतं.

वर्ल़्ड कपमध्ये 16 जूनला झालेल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी पराभूत केलं होतं. मँचेस्टरवर झालेल्या सामन्यातील विजयासह भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अपाराजित राहण्याचा इतिहास कायम ठेवला.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

First published: June 22, 2019, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading