World Cup : संगकाराचा विश्वविक्रम इंग्लंडमध्ये मोडणार का?

World Cup : संगकाराचा विश्वविक्रम इंग्लंडमध्ये मोडणार का?

2015च्या वर्ल्ड कपमध्ये संगकाराने 7 सामन्यात 4 शतकांसह 541 धावा केल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 17 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने वर्ल्ड कपमधील काही विक्रमांची चर्चा होत आहे. यात श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकाराच्या एका विक्रमाची चर्चा आहे. त्याचा हा विक्रम या वर्ल्ड कपमध्ये कोणता फलंदाज मोडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंडच्या खेळपट्टीवर धावांची बरसात होण्याची शक्यता आहे. यात श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये केलेला विक्रम मोडला जाऊ शकतो. त्याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये 7 सामन्यात 4 शतकांसह 541 धावा केल्या होत्या.

एका वर्ल्ड कपमध्ये चार शतके करण्याचा विक्रम कुमार संगकाराने केला होता. त्याने बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्याविरुद्ध शतक केलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ, मॅथ्यू हेडन आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या तीन शतकांच्या विक्रमाला मागे टाकलं होतं.

वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत 8 फलंदाजांनी 4 आणि त्यापेक्षा जास्त शतकं केली आहेत. यामध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याने खेळलेल्या सर्व वर्ल्ड कपमध्ये 6 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर संगकारा, रिकी पाँटिंग यांनी 5 शतके केली आहेत. तर सौरव गांगुली, एबी डिव्हीलियर्स, मार्क वॉ, तिलकरत्ने दिलशान आणि माहेला जयवर्धने यांनी प्रत्येकी 4 शतकं केली आहेत.

PHOTOS : सुपर मॉडेल्सपेक्षा कमी नाहीत 'या' क्रिकेटपटूंच्या पत्नी

वैतागलेल्या महिलेनं चपलेनं पतीला धू-धू धुतलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading