World Cup : रबाडा म्हणाला होता बालिश, विराटने दिलं हे उत्तर

ICC Cricket World Cup 2019 : पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीसह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीनेसुद्धा रबाडाच्या कमेंटवर उत्तर दिलं.

  • Share this:

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कसिगो रबाडाने दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे. रबाडाने कोहलीला बालिश असल्याचं म्हटलं होतं. त्यावर कोहली म्हणाला की, याबद्दल सार्वजनिक व्यासपीठावर बोलणं योग्य नाही. त्याच्याशी भेटूनच बोलणं पसंद करेन.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने ही प्रतिक्रिया दिली. कोहली म्हणाला की, मी रबाडाविरुद्ध बोलण्यासाठी पत्रकार परिषदेचा वापर करणार नाही. जर माझ्यात आणि रबाडामध्ये ही गोष्ट आहे तर दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. तो एक चांगला गोलंदाज असून प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना घाम फोडण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याचा सामना आम्हाला जपून करावा लागेल.

पत्रकार परिषदेवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने सुद्धा कोहलीबद्दल रबाडाच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मला माहिती नाही की रबाडाने कशाबद्दल असं म्हटलं. रबाडाने कोहलीबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर मी काही बोलू शकणार नाही.

एका मुलाखतीवेळी रबाडाने कोहलीला बालिश असल्याचं म्हटलं होतं. याबद्दल त्याने आयपीएलमधील सामन्यात झालेल्या घटनेचा उल्लेख केला होता. रबाडा म्हणाला होता की, जेव्हा कोणी कोहलीला काही म्हणतं त्यावेळी त्याला राग येतो हा बालिशपणा आहे.

रबाडा म्हणाला होता की, प्रत्यक्षात मी खेळाच्या रणनीतिचा विचार करत होतो पण विराटने मला आश्चर्याचा धक्काच दिला. जेव्हा तुम्ही त्याला उलट काही बोलता तेव्हा राग येतो. मी त्याला समजून घेऊ शकलो नाही. कोहली चांगला खेळाडू आहे पण तो अपशब्द ऐकू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या