World Cup : भारताचा पहिला सामना छोट्या पंजाबमध्ये, जाणून घ्या या 10 गोष्टी

World Cup : भारताचा पहिला सामना छोट्या पंजाबमध्ये, जाणून घ्या या 10 गोष्टी

ICC Cricket World Cup 2019 : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरुवात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी सुरू आहे.

  • Share this:

साऊथॅम्पटन, 06 जून : इंग्लंडमध्य़े 30 मे पासून सुरू झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरूवात झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीला विक्रम  करण्याची संधी आहे.

भारताचा कर्णधार  आणि रनमशिन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करण्यासाठी 157 धावा कमी आहेत. त्याच्या नावावर 10 हजार 843 धावा आहेत. कमी सामन्यात 11 हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार करण्य़ासाठी त्याला 281 धावांची गरज आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेला सामना इंग्लंडमधील साउथॅम्पटन सहरातील रोज बाउल क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे. या ग्राउंडचे डिझाईन प्रख्यात आर्किटेक्ट मायकल हॉपकिन्स यानी केलं आहे. इथं सर्वात लहान सीमारेषा स्ट्रेटला 76 मीटरवर आहे तर इतर बाउंड्री 79 ते 82 मीटर आहेत.

गेल्या 5 वर्ल्ड कपचे रेकॉर्ड पाहता भारताने 3 सामन्यात विजय मिळवून विजयी सुरुवात केली आहे. तर दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. यातील एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका पराभूत झाल्यास पहिल्यांदा त्यांना सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभव होईल.

सामन्यावेळी वातावरण चांगले राहिल. सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण असेल मात्र, नंतर फिरकीपटू आणि फलंदाजांना अनुकूल स्थिती असेल.

इंग्लंडच्या या मैदानावर पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे.  फलंदाजांसाठी ही खेळपट्टी नंदनवन असल्याचं मानलं जातं. याआधी झालेल्या एकदिवसीय सामन्यात 743 धावांचा पाऊस पडला होता.

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यांचे तीन खेळाडू जखमी आहेत. यामध्ये हाशिम आमला, लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे. तर डेल स्टेन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांच्यासमोर भारताच्या तंदुरुस्त खेळाडूंचे आव्हान असणार आहे.

भारताकडे नंबर एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, कुलदीप चहल, भुवनेश्वर आणि मोहम्मद शमी यांच्या सारखे गोलंजदाज आहेत. तर फलंदाजीत शिखर धवन, रोहित शर्मा, कोहली, धोनी आहेत.

इंग्लंडच्या साउथहॉलला छोटा पंजाब असंही म्हटलं जातं. इथं भारतीय पंजाबी लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी सामना बघायला जाणाऱ्यांना परदेशात आहोत असं वाटणार नाही.

रोहित शर्माला 700 चौकारांसाठी एक चौकाराची गरज आहे. तसेच त्याला 12 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 74 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर शिखर धवनच्या 20 धावा होताच 9000 धावा पूर्ण होतील.  अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला 400 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण करण्यासाठी 3 विकेट घेण्याची आवश्यकता आहे.

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या