पांड्याची तुलना करताच कपिल देव यांनी दिलं 'हे' उत्तर

पांड्याची तुलना करताच कपिल देव यांनी दिलं 'हे' उत्तर

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱे माजी कर्णधार कपिल देव यांनी हार्दिक पांड्याची त्यांच्यासोबत होत असलेल्या तुलनेबद्दल प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

मुंबई, 08 मे : भारताला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी एका कार्यक्रमात हार्दिक पांड्याची आपल्यासोबत होत असलेल्या तुलनेबद्दल प्रतिक्रिया दिली. बुधवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी क्रिकेटशिवाय खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. कपिल देव म्हणाले की, मी कधीही गाणं गायलं नाही. आईने गाणं सोडून काहीही कर असं सांगितलं होतं.

कपिल देव यांना हार्दिक पांड्याशी तुलना होत असल्याबद्दलही विचारण्यात आला. त्यावर कपिल देव म्हणाले की, पांड्यावर कोणताही दबाव टाकू नका. जबाबदारीचं ओझं देण्यापेक्षा त्याला मोकळेपणानं खेळू द्या. त्याचा नैसर्गिक खेळ बाहेर येऊ द्या. मला कोणाचीही तुलना करणं योग्य वाटत नाही असंही त्यांनी सांगितलं.

वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ संतुलित असल्याचं कपिल देव यांनी म्हटलं आहे. यात दावेदार म्हणून त्यांनी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला प्राधान्य दिलं आहे. तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान हेसुद्धा कमाल करू शकतात असं त्यांनी सांगितलं.

भारतीय संघ संतुलित असून संघात तरुण आणि अनुभवी खेळाडू आहेत. इतर संघांच्या तुलनेत भारताकडे सर्वात जास्त अनुभव आहे. चार वेगवान गोलंदाज, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू भारतीय संघात आहेत असंही कपिल देव म्हणाले.

वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

First published: May 8, 2019, 6:17 PM IST

ताज्या बातम्या