इंग्लंडच्या धोनीचा हा VIDEO बघाच, पाकचा सलामीवीर 'असा' फसला

इंग्लंडच्या धोनीचा हा VIDEO बघाच, पाकचा सलामीवीर 'असा' फसला

वेस्ट इंडिजविरुद्ध 105 धावांत बाद झालेल्या पाकिस्तानने इंग्लंडला 349 धावांचे आव्हान दिले.

  • Share this:

नॉटिंगहम, 03 जून : वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात नॉटिंगहम इथं सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलरने पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानला बाद करून पहिला धक्का दिला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 14 षटकांत 82 धावांची भागिदारी केली होती. 15 व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर फखर जमान बाद झाला. त्याला बटलरने यष्टीचित केलं. फखर जमानने 40 चेंडूत 36 धावा केल्या.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनीच्या यष्टीरक्षणाबद्दल कोणी सांगण्याची गरज नाही. तो मागे असताना फलंदाजाने क्रिजमध्ये असतानासुद्धा पाय उचलू नये असं आयसीसीनं ट्वीट केलं होतं. इंग्लंडच्या जोस बटलरनेसुद्धा फखर जमानला चपळाईनं बाद केलं. 15 व्या षटकात फखर जमानला मोईन अलीने चकवलं आणि बटलरने यष्टीचित करून संधी साधली. ही जोडी फोडण्यात इंग्लंडला यश आलं तरी पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजांसह सर्वांनीच चांगली खेळी केली. त्यांनी 349 धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं.वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 348 धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोंलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 14 षटकांत 82 धावा केल्या. त्यानतंर 15 व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीव फखर जमान यष्टीचित झाला. त्याने 40 चेंडूत 36 धावा केल्या. त्यानंतर 21 व्या षटकात मोईन अलीनेच इमाम उल हकला बाद केलं. इमामने 58 चेंडूत 44 धावा केल्या.

पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी 88 धावांची भागिदारी केली. या दोघांची जोडी मोईन अलीने फोडली. बाबर आझम 66 चेंडूत 63 धावा काढून बाद झाला. त्यावेळी संघाच्या 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बाबर बाद झाल्यानंतर हाफीज आणि कर्णधार सर्फराज अहमदने 80 धावांची भागिदारी केली. मोहम्मद हाफीजला बाद करून मार्क वूडने पाकिस्तानला चौथा धक्का दिला. हाफीजने 84 धावा केल्या. 46 व्या षटकात पाकिस्तानच्या 300 धावा झाल्या. कर्णधार सर्फराज अहमदने 43 चेंडूत 55 धावांची वेगवान खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात

वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट


VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या