ओव्हल, 30 मे : जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची गेली पाच वर्ष वाट पाहत होते, त्या विश्वचषक स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिला सामना इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात ओव्हलच्या मैदानावर होत आहे. साऊथ आफ्रिकेने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या यजमानांना दुसऱ्या चेंडूत पहिला झटका बसला.
विश्वचषकाआधी जगभरातील सर्व धडाकेबाज फलंदाज आयपीएल खेळण्यात व्यस्त होते. दरम्यान या स्पर्धेत पदार्पणातच इंग्लंडचा एक खेळाडू चर्चेचा विषय बनला, तो खेळाडू म्हणजे जॉन बेअरस्टो. मात्र विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मात्र त्याला एक लाजीरवाणा सन्मान मिळाला आहे. बेअरस्टो विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद होत, तो गोल्डन डकचा मानकरी झाला आहे. साऊथ आफ्रिकेचा हुकुमी एक्का असलेल्या इमरान ताहीरनं आपल्या दुसऱ्याच चेंडूत बेअरस्टोची विकेट घेतली.
बेअरस्टोच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड
जॉनी बेअरस्टो हा जगातला पहिला सलामीवीर आहे, जो विश्वचषकातील सामन्यात शुन्यावर बाद झाला. तो इंग्लंडचा पहिला सलामीवीर आहे. ज्यानं पहिल्यांदा फलंदाजी करताना शुन्यावर आपली विकेट टाकली. दरम्यान वर्ल्डकपच्या इतिहासात हा प्रसंग दुसऱ्यांदा घडला आहे. 1922मध्ये जॉन राईटनं पहिल्याच ओव्हरमध्ये आपली विकेट गमावली होती.
इमरान ताहीरनं रचला इतिहास
विश्वचषकात फिरकी गोलंदाजांन पहिली ओव्हर केली आहे, असे चित्र सहसा दिसत नाही. दरम्यान इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील सामन्यात इमरान ताहिरनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत एक इतिहास रचला आहे.
Off he goes! 🏃♂️
📽️ @ImranTahirSA takes the first wicket of #CWC19 (and also completes one lap of The Oval!) How many more wickets do you think the spinner will take today?#ENGvSA https://t.co/5R8Ce0CwVe
— Cricket World Cup (@cricketworldcup) May 30, 2019
इंग्लंड-साऊथ आफ्रिका आमने-सामने
या दोन्ही संघातील एकदिवसीय क्रिकेटमधले आकडे पाहिल्यास त्यांच्यात द्वंद्व युध्द दिसून येते. इंग्लंडनं साऊथ आफ्रिका विरोधात 59 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 26 सामन्यात विजय मिळवता आला आहे तर, 29 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. इंग्लंडनं आपल्या घरच्या मैदानावर आफ्रिकेच्या संघाला 15वेळा नमवले आहे तर, 8वेळा पराभव पत्करला आहे.
साऊथ आफ्रिकेचा संघ : फाफ डुप्लेसीस(कर्णधार),, क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, एडेन मार्करम, रेसी वैन डर डुसां, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, प्रिस्टोरियस, फेलुकवायो,रबाडा, लुंगी एन्गिडी, एनरिज नॉर्तजे, इमरान ताहिर आणि तबरेज शम्सी.
इंग्लंडचा संघ: जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, जो रूट, ऑयन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोइन अली, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, मार्क वुड, जेम्स विंस, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि टॉम करन.
शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO