..म्हणून विराटला आउट करायचं आहे, 3 वनडे खेळलेल्या गोलंदाजाची इच्छा!

..म्हणून विराटला आउट करायचं आहे, 3 वनडे खेळलेल्या गोलंदाजाची इच्छा!

काही आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या खेळाडूला विराटची विकेट घ्यायची आहे.

  • Share this:

लॉर्डस, 22 मे : इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ मंगळवारी रात्री रवाना झाला. दरम्यान, इंग्लंडने त्यांच्या संघात तीन बदल केले. आयपीएलमध्ये राजस्थान रॉय़ल्स कडून खेळलेल्या जोफ्रा आर्चरला त्यांनी संघात घेतलं आहे. निवड झाल्यानंतर बोलताना जोफ्रा म्हणाला की, मला विराटची विकेट घ्यायची आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील नंबर एकचा फलंदाज आहे. त्याची विकेट घेण्याची इच्छा इंग्लंडचा खेळाडू जोफ्रा आर्चरने व्यक्त केली आहे. इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात अनुभवी गोलंदाजाच्या जागी जोफ्राची वर्णी लागली आहे.

वेस्ट इंडीजमध्ये जन्म झालेल्या आर्चरला डेव्हिड विलीच्या जागी इंग्लंडच्या संघात स्थान दिलं आहे. त्याने काही आठवडे आधीच इंग्लंडकडून पदार्पण केलं आहे. विलीच्या तुलनेत त्यानं फक्त तीन एकदिवसीय आणि एक टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

वर्ल्ड कप क्रिकेट संघात निवडं झाल्यानंतर इंग्लंडच्या इतर गोलंदाजांच्या तुलनेत मला जास्त फायदा होईल असं आर्चर म्हणाला. राजस्थानकडून खेळताना जगातील सर्वोत्तम फलंदाजांना गोलंदाजी करता आली असं जोफ्राने सांगितलं.

वाचा : 'या' दोन देशातील युद्धामुळे पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला उशिर

आर्चर म्हणाला की, मला विराट कोहलीला आउट करायचं आहे कारण आयपीएलमध्ये मला ती संधी मिळाली नव्हती. विराट कोहलीला जास्ती जास्त लेग स्पीनर्सनी बाद केलं होतं. कोहलीशिवाय डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायची इच्छा आहे पण त्याने निवृत्ती घेतली आहे असं जोफ्रा म्हणाला.

VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषदबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 10:14 AM IST

ताज्या बातम्या