VIDEO : हिटमॅनची खेळी मिस झाली का? पाहा रोहितचं झंझावाती शतक

ICC Cricket World Cup 2019 : INDvsPAK : पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 06:59 PM IST

VIDEO : हिटमॅनची खेळी मिस झाली का? पाहा रोहितचं झंझावाती शतक

मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्माच्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर 46.4 षटकांत 4 बाद 305 धावा केल्या आहेत. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. याखेळीत रोहित तीनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा रोहितने समाचार घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही.


रोहित बाद झाला. त्यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया विरोधातही हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्यानं 48 धावांची तुफान खेळी केली होती. मात्र, या सामन्यात पांड्या केवळ 26 धावा करत बाद झाला. तर, दुसरीकडे कोहलीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तानला त्यांचा हा निर्णय महागात पडत आहे.

रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

Loading...

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live


VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...