World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

भारताच्या या जखमी खेळाडूमुळं विराटच्या मधल्या फळीच्या चिंता वाढल्या आहेत.

  • Share this:

लंडन, 25 मे : आयसीसी विश्वचषकाला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्व संघांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान आज भारतीय संघाचा पहिला सराव सामना होणार आहे. न्युझीलंड विरोधात होणाऱ्या या सराव सामन्यात भारताला इंग्लंडच्या परिस्थितीत पहिल्यांदा खेळावे लागणार आहे. मात्र, या सामन्याआधीच विराटच्या चिंता वाढल्या आहेत.

ईएसपीन या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. त्यामुळं विराटच्या चिंता वाढल्या आहेत. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. फलंदाजीचा सराव करत असताना,डावखुरा गोलंदाज खलील अहमद गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्यानं टाकलेल्या बाऊंसरचा सामना शंकर करु शकला नाही. त्यामुळं त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यानं लगेचच मैदान सोडले. त्याच्या या दुखापतीमुळं प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या चिंता वाढल्या आहेत.

बीसीसीआयकडून कोणतीही माहिती नाही

दरम्यान, विजय शंकरच्या या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. शंकरची दुखापती गंभीर असल्यास त्याला आज न्युझीलंड विरोधात होणाऱ्या सराव सामन्याला मुकावे लागेल. त्यामुळं भारताच्या मधल्या फळीच्या चिंता वाढल्या आहेत. शंकर दुखापतग्रस्त झाला तर, अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळेल.

कोण आहे विजय शंकर

विजय शंकर हा तमिळनाडूचा खेळाडू असून रणजी सामन्यात त्यानं स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. विजय शंकर सगळ्या प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज होता. त्याच्या या खेळीमुळेच विजयची वर्णी विश्वचषक संघात झाली असावी. त्याने केवळ 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर तेवढेच टी-20 सामने खेळले आहेत. त्यामुळं चौथ्या क्रमांकाकरिता विजय शंकरची वर्णी लगली असली तरी, त्याच्या निवडीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!


माजी आमदाराच्या कार्यक्रमात पैशांचा पाऊस, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या