World Cup : भारतीय संघाला दिलासा, केदार जाधव तंदुरुस्त पण...

आयपीएलमध्ये दुखापत झालेल्या केदार जाधवला शेवटच्या तीन सामन्यांना मुकावं लागलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 12:45 PM IST

World Cup : भारतीय संघाला दिलासा, केदार जाधव तंदुरुस्त पण...

नवी दिल्ली, 18 मे : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ 22 मे रोजी रवाना होणार आहे. दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव तंदुरुस्त झाला आहे. आयपीएलमध्ये जखमी झाल्याने त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केदार जाधवला आयपीलएमध्ये खेळताना दुखापत झाली होती. यामुळे तो चेन्नईकडून क्वालिफायरच्या दोन आणि फायनल अशा तिन्ही सामन्यात खेळता आलं नव्हतं.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध केदार जाधव चेंडू अडवताना जखमी झाला होता. यावेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर नसली तरी त्याला तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दुखापत झाल्यानंतर केदार जाधव संघाचे फिजिओ पेट्रिक फरहत यांच्या देखरेखीखाली होता. दुखापतीतून तो सावरला असून फरहत यांनी केदारचा अहवाल बीसीसीआयकडे सोपवला आहे. त्याने फिटनेस टेस्टसुद्धा पास केली आहे. वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जग्गजेत्यांना दिला जातो खोटा चषक; World Cup बद्दलच्या कधीही न ऐकलेल्या 5 गोष्टी

Loading...

संघाच्या फिजिओंनी दिलेल्या अहवालानंतर केदार जाधव इंग्लंडला जाणार हे नक्की आहे. मात्र, तो 25 आणि 28 मे रोजी होणाऱ्या सराव सामन्यात खेळणार की नाही हे सांगणं कठीण आहे. तो सराव सामने न खेळताच वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.


VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...