ले जायेंगे! वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव

हिटमॅन रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 228 धावांचं आव्हान पूर्ण करत वर्ल्ड कपमधील पहिला सामना जिंकला.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 10:53 PM IST

ले जायेंगे! वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव

साउथॅम्पटन, 05 जून : हिटमॅन रोहित शर्माचं संयमी शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून वर्ल्ड कपला दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. त्याला रबाडाने बाद केलं. धवनने 8 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीसुद्धा 18 धावा काढून बाद झाला. भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज केएल राहुलने रोहित शर्मासोबत 85 धावांची भागिदारी केली. केएल राहुलला राबाडाने बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रोहित शर्मा आणि धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली. विजयासाठी 13 धावा हव्या असताना धोनी बाद झाला. त्यानंतर पांड्या आणि रोहित शर्माने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं 50 षटकांत 9 बाद 227 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेटचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डेव्हिड मिलर, अँडी पेहलुक्वायो आणि ख्रिस मोरिस यांना 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या. सलामीवीर हाशिम आमला आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाले.

आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेला हा निर्णय महागात पडला. भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजांनी आफ्रिकेला दणका दिला. पहिल्या दहा षटकांत जसप्रीत बुमराहने तर 20 व्या षटकात युझवेंद्र चहलनं आफ्रिकेच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवलं. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीरांना बुमराहनं आपल्या तीन षटकांत माघारी धाडलं. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला.

तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करणाऱी जोडी युझवेंद्र चहलनं फोडली. त्यानं पहिल्यांदा रॉसी वान डेर डुसेन नंतर डुप्लेसीला बाद केलं. त्याच्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने जेपी ड्युमिनीला बाद करून आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातलं. त्याने आफ्रिकेच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं. डुप्लेसी, डुसे यांच्यानंतर डेव्हिड मिलर आणि अँडिल पेहलुक्वायोला चहलने बाद केलं.

वाचा : World Cup : चहलचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', 'लगान'च्या कचराची आठवण करून देणारा VIDEO

Loading...

दरम्यान सामन्याची नाणपेक करताना गोंधळ झाला. आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीने नाणं फेकलं. त्यावेळी कोहलीनं हेड म्हटलं आणि टेल्स पडलं. यावेळी कॉमेंटेटर मार्क निकोलस यांनी भारताने टॉस जिंकल्याचं म्हणत माइक कोहलीकडे नेला. तेव्हा मॅच रेफरींनी ही चूक सुधारली आणि भारताने नव्हे तर दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकल्याचं सांगितलं.

वाचा : विराटचं नाणं खणखणीत, जे 20 वर्षांत जमलं नाही ते चहलनं केलं


SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...