Load More
मॅंचेस्टर, 27 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होत असलेल्या सामन्यात भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात विराट कोहलीने 72 धावांची तर, धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला. भारतीय संघाची भिस्त विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर असतानाच राहुल 48 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याच्या खेळीच्या जोरावर भारतानं 268 धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. शमीनं दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पांड्याने अॅम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि अॅलनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला.
वेस्ट इंडिज विरोधात 37 धावांची खेळी करत विराटनं 20 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असं करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर (463 सामन्यात 18 हजार 426) आणि सौरव गांगुली (308 सामन्यात 11 हजार 353 धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे. याआधी विराटने 10 हजार धावांचा टप्पा देखील सर्वात वेगाने गाठला होता. विराटनं हा पराक्रम करताच विजय शंकर 14 धावांवर बाद झाला. कोहलीनं आपले अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीच्या जागी केदार जाधवला पाठवण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फरक पडला नाही, केदार जाधव 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं आक्रमक 46 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतानं 268 आकडा गाठला.
