सुनील गावस्कर म्हणतात, ....तर भारत जिंकू शकतो पहिला सामना

icc cricket world cup 2019 : भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

  • Share this:

इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत 5 जूनला होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होणार आहे.

वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकू शकतो असं म्हटंल होतं. इंग्लंडमधील बदलतं वातावरण भारतासाठी चांगलं असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

 भारताच्या पहिल्या सामन्याआधी माजी क्रिेकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताचा जय-पराजय खेळपट्टीवर अवलंबून असेल असं म्हटलं आहे. खेळपट्टीवर हिरवळ नसेल आणि संघाने पहिल्यांदा फिल्डिंग केली तर भारत सामना जिंकू शकतो.

भारतीय संघ वर्ल्ड कपची तयारी करत असून सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. सरावादरम्यान कमतरता शोधून त्यावर काम केलं जात आहे. सध्या केएल राहुल आणि धोनी दोघेही फॉर्ममध्ये आहेत. तर हार्दिक पांड्यासुद्धा तयार आहे.

सरावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पण त्याच्या या दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 05:31 PM IST

ताज्या बातम्या