India vs South Africa: पंतप्रधान मोदींनी भारताला दिला विजयाचा मंत्र!

India vs South Africa: पंतप्रधान मोदींनी भारताला दिला विजयाचा मंत्र!

भारताच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून: भारतीय संघाच्या वर्ल्डकप मोहिमेला आज सुरुवात झाली आहे. साऊथहॅम्प्टन येथे सुरु असलेल्या सामन्यात भारत आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. भारताच्या या पहिल्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. PM मोदींनी भारतीय खेळाडूंना ‘खेल भी जीतो और दिल भी’ असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले मोदी-

भारतीय संघाच्या वर्ल्डकप अभियानाला आज पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा. स्पर्धेत उत्तम क्रिकेट आणि खेळाडूवृत्ती पहायला मिळेल अशी आशा मोदींनी व्यक्त केली. खेल भी जीतो और दिल भी असे त्यांनी म्हटले आहे.

क्रिकेट वर्ल्डकपला 30 मेपासून सुरुवात झाली असून भारताचा पहिला सामना आज आफ्रिकेविरुद्ध होत आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs South Africa Live Score पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

VIDEO: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात? काय म्हणाले अजित पवार

First published: June 5, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading