World Cup : VIDEO : वाघा बॉर्डरवर नाही तर मैदानावर जोर दाखवा, शोएब अख्तर भडकला

World Cup : VIDEO : वाघा बॉर्डरवर नाही तर मैदानावर जोर दाखवा, शोएब अख्तर भडकला

ICC Cricket World Cup 2019 : भारताविरुद्धचा पराभव शोएब अख्तरच्या जिव्हारी, पाकिस्तानच्या खेळाडूंवर काढला राग.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर त्यांच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली आहे. कर्णधार सर्फराज अहमद त्याच्या फिटनेसवरून ट्रोल होत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संघातील अनेक खेळाडूंना फैलावर घेतलं आहे. शोएबनं यूट्यूबवर टाकलेल्या व्हिडिओत गोलंदाज हसन अली आणि फलंदाज बाबर आझमला सल्ला दिला आहे.

पाकिस्तानच्या संघात गटबाजी सुरू असल्याचं समोर आलं होतं. तसेच पाकिस्तानी चाहत्यांनी कर्णधार सर्फराज अहमदवर टीका केली होती. शोएब अख्तरने सर्फराजला बिनडोक म्हटलं होतं. तसेच पाकिस्तानच्या संघाची खरी ताकद बॉलिंग आहे बॅटिंग नव्हे हे सर्फराजला माहिती नाही. त्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेतली. या मैदानावर इंझमाम आणि सईद अन्वरला 227 धावांचा पाठलाग करता आला नाही तर यांना कसं जमलं असतं? असा प्रश्नही शोएबनं विचारला आहे.

पाकिस्तानच्या गोलंदाजीची धुरा हसन अलीच्या खांद्यावर आहे. त्यालाही शोएब अख्तरने कठोर शब्दांत सल्ला दिला आहे. हसन तू वाघा बॉर्डरवर उड्या मारू नको त्यापेक्षा जे काही दाखवायचं आहे ते मैदानावर दाखव असं शोएबनं म्हटलं आहे. प्रत्येक सामन्यात 6 किंवा 7 विकेट घेशील तेव्हा उड्या मारलेल्या चांगलं. पाकिस्तानसाठी हसन काहीच करत नाही. त्याच्याकडे ना वेग आहे ना स्विंग असा कसला गोलंदाज असंही शोएबने म्हटलं.

शोएब अख्तरने विराट कोहलीला आदर्श मानणाऱ्या बाबर आझमलासुद्धा फैलावर घेतलं . बाबरने कोहलीची कॉपी करण्यापेक्षा त्याच्याकडून शिकावं, कोहली 25 धावा करतो तर त्यात फक्त दोन चौकार असतात. बाकीच्या धावा तो एकेरी किंवा दुहेरी घेण्यावर भर घेतो. त्याच्या फलंदाजीतून शिका नक्कल करून काही होणार नाही असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकच्या फलंदाजीचे शोएब अख्तरनं वाभाडे काढले. इमाम उल हक कसला सलामीवीर आहे? त्याच्याकडे तंत्रशुद्ध खेळ नाही. त्याला कव्हर ड्राईव्ह मारता येत नाही. फक्त ग्लान्स खेळतो. मला वाटतं ही चूक आपली म्हणजेच देशाची आहे. आपण नको त्या खेळाडूंकडून विजयाची अपेक्षा करून वेळ वाया घालवतोय अशा शब्दांत शोएब अख्तरने पाकिस्तानच्या खेळाडूंवर टीका केली आहे.

हसन अलीला शोएब अख्तरनं वाघा बॉर्डरपेक्षा मैदानावर दम दाखव असं म्हणण्याचं कारण आहे. हसन अलीने गेल्या वर्षी 22 एप्रिलला वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी सैन्यासोबत परेडमध्ये उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याने परेडमधील जवानांप्रमाणेच जोर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल हसन अलीवर टीकाही झाली होती.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

वाचा- विराटचा डोळा सचिन आणि लाराच्या विश्वविक्रमावर; अफगाणविरुद्ध आहे संधी!

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading