VIDEO: अभिनंदन यांची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दिलं 'असं' उत्तर! muka muka tv ad | india vs pakistan

VIDEO: अभिनंदन यांची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दिलं 'असं' उत्तर! muka muka tv ad | india vs pakistan

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जून: क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामन्यात उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. केवळ या दोन्ही देशातील चाहते नाही तर संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या सामन्याच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मौका या जाहिरातीवरून सुरु झालेल्या अॅडवॉरमध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताने भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या खिल्ली उडवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याला उत्तर या नव्या व्हिडिओमधून देण्यात आले आहे.

यूट्यूबवर व्ही सेव्हन पिक्चर्स यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात अभिनंदन यांची खिल्ली उडवणाऱ्या व्हिडिओला त्याच भाषेत उत्तर देण्यात आले आहे. 20 तासापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ 10 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका सलूनमध्ये भारतीय चाहता युवराज सिंगची टी-20 वर्ल्डकपमधील बॅटिंग पाहत बसला आहे. तेव्हाच एक पाकिस्तानचा चाहता येथे येतो आणि भारतीय चाहत्याला भेटवस्तू देतो. ही भेट रुमाल असते. पाकिस्तान सोबतचा सामना हरल्यानंतर चेहरा लपवण्यासाठी त्याचा उपयोग करावा असा सल्ला देखील पाकचा चाहता देतो. त्यावर भारतीय चाहता काहीच न बोलता सलून वाल्याला इशारा करतो.

सलूनवाला पाकिस्तानी चाहत्याची दाढी अभिनंदनच्या स्टईलने केली. यावर भारतीय चाहता त्याला सांगतो, 'बड़ा जालिम खेल है ये, सिर्फ एक दिन लगता है बाप को बेटे को समझाने में कि तेरी किस्मत में वर्ल्ड कप नहीं, अभिनंदन का जूठा कप ही रहेगा'.

सेहवागच्या केवळ एका वाक्यावर पाकच्या खेळाडूने केला होता 15 मिनिटांचा VIDEO

आता भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचं एक जुनं ट्विट चर्चेत आलं आहे. 2017 मध्ये एका पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सेहवागने ट्विट केले होते. त्यात सेहवागने पोते के बाद बेटे, कोई बात नही बेटा, वेल ट्राय! असं म्हणत पाकिस्तानला टोला हाणत भारताचे विजयाबद्दल अभिनंदन केलं होते. तेव्हा त्याने बाप बाप होता है! असा हॅशटॅगही वापरला होता.

सेहवागच्या ट्विटनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने तब्बल 15 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्याने अपशब्दही वापरले होते. त्यावेळी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं तर भारताला लंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा राशिदने सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या खेळाडूंचे वागणे चांगले होते पण सेहवाग मात्र त्यांच्यात नाही असं म्हटलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.

उदयनराजे रामराजेंवर भडकले, म्हणाले पिसाळलेल्यांना आधी आवरा

First published: June 15, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading