Ind Vs Pak : 25 Overs Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली

icc cricket world cup 2019 India vs Pakistan : पहिल्यांदाच सलामीला उतरलेल्या केएल राहुले संयमी खेळी करत अर्धशतक साजरे केले.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 05:08 PM IST

Ind Vs Pak : 25 Overs Highlights : सलामीवीरांची अर्धशतके, रोहित-राहुलची जोडी जमली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मँचेस्टरवर सामना सुरू आहे. सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केली असून रोहित आणि केएल राहुल यांनी अर्धशतक साजरं केलं आहे. पाकिस्तान विरोधात भारताची ही पहिली शतकी भागीदारी.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केलं. पहिल्या दहा षटकात त्यांच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे रोहित शर्माला जीवदान मिळालं. रोहित धावबाद होता होता वाचला. त्याला धावबाद करण्याची संधी पाकच्या हातातून निसटली.

भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्यादाच एकत्र सलामीला उतरताना शतकी भागिदारी केली. रोहित शर्माने फटकेबाजी केली तर लोकेश राहुलने संयमी खेळी केली. पाकने प्रथम गोलंदाजी घेऊन भारतीय फलंदाजांना जखडून ठेवण्याचे मनसुबे रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी उधळून लावले. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला.

Loading...

भारतीय चाहते मैदानावर ब्लू जर्सीत दिसत असून सामन्याचा आनंद लुटत आहेत. या सामन्यात पाऊस पडतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी तशी चिन्हे नाहीत.

बॉलीवूड अभिनेता रणवीरसिंग सुद्धा या सामन्यासाठी मैदानावर उपस्थित आहे. त्याने सामन्याच्या आधी तिथल्या वातावरणाची माहिती दिली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार आले. आता मोदी आया है 2019 वर्ल्ड कप भी आयेगा असा संदेश लिहलेले टी शर्ट घालून चाहते सामन्याला उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...