INDvsPAK : शंभर कोटींचा सामना, दहा सेकंदाची आहे इतकी किंमत!

INDvsPAK : शंभर कोटींचा सामना, दहा सेकंदाची आहे इतकी किंमत!

ICC Cricket World Cup 2019 : India vs Pakistan : भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरही पावसाचे सावट आहे. हा सामना रद्द झाला तर मोठे नुकसान होऊ शकते.

  • Share this:

लंडन, 15 जून : वर्ल्ड कपच्या फायनलपेक्षा साखळी फेरीत होत असलेल्या भारत पाक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मँचेस्टरमध्ये होत असलेल्या या सामन्यात २० हजार प्रेक्षक क्षमता असलेली तिकीटे काही तासांत संपली होती. इंग्लडंमध्ये आतापर्यंत तब्बल चार सामने पावसाने रद्द झाले हा एक विक्रमच आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. जर हा सामना रद्द झाला तर प्रेक्षक नाराज होतीलच पण स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला मोठे नुकसान होऊ शकते. इंग्लंमधील हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क घेतलेल्या वाहिनीला भारत पाक सामना न झाल्यास मोठा फटका बसू शकतो. त्यांना या एका सामन्यातून 100 कोटी रुपये मिळतील यावर परिणाम होऊ शकतो. या सामन्याचा विमा काढला असून त्याचीच किंमत 50 कोटी इतकी आहे. पण सामना रद्द झाल्यास ती संपूर्ण रक्कम मिळेल की नाही सांगता येत नसल्याचे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढती महत्त्वाच्या आहेत. हे सामने पावसाने बाधित झाले किंवा रंगतदार झाले नाहीत तर जाहिरातींवर परिणाम होतो. या सामन्यांदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींसाठी आधीच आगाऊ रक्कम घेण्यात आली आहे. तसेच शेवटच्या क्षणी जाहिरात बुक करण्यासाठी अधिक रक्कम आकारली जात आहे.

बुमराहला या अभिनेत्रीने केलंय क्लीन बोल्ड? पाहा कोण आहे ती!

भारत-पाक सामन्यावेळी 10 सेकंदासाठी 25 लाख रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्या इतर सामन्यांना याच जाहिराती 18 लाख रुपयांपर्यंत दाखवल्या जातात. तर बाकी देशांच्या सामन्यावेळी फक्त 5 लाख रुपये आकारले जातात.

India Vs Pakistan : काळाबाजार तेजीत, एका तिकीटाची 'इतकी' किंमत!

World Cup : भारताविरुद्ध पाकिस्तानचा खेळाडू वापरणार 'विराट'अस्त्र

World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!

SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अ‍ॅडवॉर'

First published: June 15, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading