World Cup : INDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला!

icc cricket world cup 2019 : INDvsPAK : कट्टक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या जागी केएल राहुल सलामीला उतरला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 03:05 PM IST

World Cup : INDvsPAK : केएल राहुल पहिल्यांदाच हिटमॅनसोबत उतरला सलामीला!

मँचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cup 2019 मधील भारत पाक महामुकाबल्याला सुरुवात झाली असून पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्याने त्याच्या जागी केएल राहुल सलामीला येईल. केएल राहुल आणि हिटमॅन रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहली यानं म्हटलं की, आमचं लक्ष प्रतिस्पर्धी संघावर नाही. आम्ही फक्त आमचा खेळ खेळणार आहे.

यापुर्वी रोहित शर्मा आणि केएल राहुलने कधीही ओपनिंग केलेली नाही. महामुकाबल्यातच दोघे पहिल्यांदा एकत्र मैदानात उतरतील. रोहित आणि केएल राहुलने याआधी टी20 सामन्यात ओपनिंग केली आहे. दोघांनी पाट टी20 सामन्यात 51.2 च्या सरासरीने 165 धावा केल्या आहेत. आता दोघांवरही या महामुकाबल्यात भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी आहे.

रोहित शर्मा फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओपनिंग करताना 122 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्याने 57 धावना केल्या होत्या. रोहितने इंग्लंडमध्ये 66.6 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. तर, भारताचे गोलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. दुसरीकडे पाकिस्तानी संघाची या स्पर्धेतली सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाविरोधात सामना गमावल्यामुळं त्यांच्यावर हा सामना जिंकण्याचे आव्हान असेल. रविवारी मँचेस्टरमधील वातावरण चांगले राहिल. पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी तो दिवसा पडण्याची शक्यता कमी आहे. तसेच ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं सांगितलं आहे.

मँचेस्टरमध्ये वाऱ्यामुळं वेगवान गोलंदाजांना सामन्यात फायदा होऊ शकतो. संयमी खेळ करणाऱ्या फलंदाजांना धावा करता येतील. या मैदानावर सर्वाधिक धावा 318 झाल्या आहेत. 1999 मध्ये याच मैदानावर भारत-पाक लढत झाली होती. तेव्हा भारताने नाणेफेक जिंकली होती. भारताने या मैदानावर शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध 2007 मध्ये खेळला होता. त्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.

Loading...

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 4 सामने रद्द झाले आहेत. यात भारत-न्यूझीलंड यांच्या सामन्याचाही समावेश आहे. असे असले तरीही भारत - पाक सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे. सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक गुण दिला जाईल. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.

VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला धम्माल वर्ल्ड कपचा अनुभव


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...