पाकने विराटसेनेची घेतली धास्ती, भारताविरुद्ध नाटक चालणार नाही!

ICC Cricket World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 16 जूनला मॅंचेस्टर इथं सामना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 10:31 PM IST

पाकने विराटसेनेची घेतली धास्ती, भारताविरुद्ध नाटक चालणार नाही!

लंडन, 14 जून : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यापैकी फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. दोन सामन्यात पराभव तर एक सामना पावसाने वाया गेला. यामुळे पाकिस्तान गुणतक्त्यात 8 व्या क्रमांकावर आहे. आता पाकिस्तानचे लक्ष भारताविरुद्धच्या सामन्याकडे लागून राहिले आहे. रविवारी 16 जूनला मँचेस्टरवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू असं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने म्हटलं आहे.

सर्फराज अहमदने आपल्या खेळाडूंना ताकीद दिली आहे की, भारताविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. यात कोणतीही चूक नको. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करावी लागेल. खेळात कमी पडल्यास काहीही कारण चालणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खानने गोलंदाजांवर त्याचे खापर फोडले होते. तसेच फलंदाजही पराभवाला कारणीभूत आहेत. सर्फराज म्हणाला की, 3 बाद 140 धावा झाल्या असताना पुढच्या 15 चेंडूत आम्ही 3 गडी गमावले.

पाकिस्तानची सुरुवात खराभ झाली. तिसऱ्याच षटकात सलामीवीर फखर जमान शून्यावर बाद झाला. त्यानंतर बाबर आज आणि इमाम उल हकने संघाला 50 धावा करून दिल्या. बाबरला नाथन कूल्टर नाइलने बाद केलं.

बाबर बाद झाल्यानंतर इमामने मोहम्मद हाफीजसोबत संघाचा डाव सावरला. त्यावेळी कमिन्सने इमामला बाद केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने मोहम्मद हाफीजला बाद करून पाकिस्तानला चौथा धक्का दिला.

Loading...

पाकिस्तानच्या 146 धावा झाल्या असताना हाफीज बाद झाला. त्यानंतर असिफ अली, हसन, वहाब रियाज आणि सर्फराज लागोपाठ बाद झाले. त्यांनी थोडी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण विजयापासून मात्र ते दूर राहिले.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का


SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...