World Cup : ICCच्या अडचणी वाढल्या, पावसामुळं झाले 100 कोटींचे नुकसान

पावसामुळं रद्द होणारे सामने आता फक्त चाहत्यांसाठी नाही तर जाहिरातदारांसाठी सुध्दा त्रासदायक

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 04:02 PM IST

World Cup : ICCच्या अडचणी वाढल्या, पावसामुळं झाले 100 कोटींचे नुकसान

लंडन, 17 जून : इंग्लंडमध्ये सध्या होत असलेला क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच ICC Cricket World Cup 2019मध्ये आतापर्यंत 4 सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. यात भारत-न्यूझीलंड सामन्याचाही समावेश आहे. यातच भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट होते. दरम्यान पावसामुळं दोन वेळा सामना थांबवलाही होती. त्यानंतर अखेर डकवर्थ लुईसचा वापर करुन भारतानं 89 धावांची पाकिस्तानवर विजय मिळवला. मात्र सतत होणाऱ्या पावसामुळं चाहते नाराज होत आहेत, मात्र आता ब्रॉडकास्टरही रुसले आहेत.

मीडिया रिपोर्टसनुसार स्टार इंडियाला पावसामुळं तब्बल 100 कोटींचा फटका बसला आहे. रविवारी झालेला भारत-पाकिस्तान सामना वगळता भारताचे इतर सामने हे 65-75 कोटी रुपयांना विकले जातात. तर, स्टारच्या प्रत्येक 15 सेकंदाच्या स्लॉटवर 15 लाखांची किंमत असते. तर, इतर संघांचे सामने 5-7 कोटी रुपयांना विकले जातात. सुत्रांच्या माहितीनुसार भारत-पाकिस्तान सामन्यातून स्टार इंडियाला 125 कोटी रुपये मिळणार होते, मात्र दोन वेळा आलेल्या पावसामुळं त्याचा फटका त्यांना बसला.

इकॉनॉमिक्स टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, स्टार इंडियाला जाहिरातीतून 100 कोटींचा फटका बसला आहे. जर पावसामुळं आणखी सामने रद्द झाले तर, स्टार इंडियाला आणखी तोटा होऊ शकतो. आतापर्यंत एकूण चार सामने पावासामुळं रद्द झाले आहेत. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यामुळं चाहते आयसीसीवर आता संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.

आयसीसीचा हा निर्णय तोट्यात

पावसामुळं रद्द झालेल्या सामन्याचा फटका काही संघांना लीग राऊंडच्या शेवटी बसू शकतो. एवढचं नाही तर भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयसीसीवर टीका होताना दिसत आहे. पावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही चाहतेही विचारत आहेत. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी, ''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. आणि त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?'', असे स्पष्टीकरण दिले आहे.

Loading...

वाचा-World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका

वाचा- World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन!

वाचा- VIDEO : INDvsPAK : गोलंदाजांची धुलाई सुरू असताना पाकच्या कर्णधाराला आली झोप!

वाचा-World Cup : ....तरच मी पाकिस्तानच्या फलंदाजांना सल्ला देणार, रोहितचा क्लिन स्वीप


VIDEO: रोहितच्या त्या शतकी खेळीवर प्रशिक्षक झाले फिदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...