मुंबई, 15 जून : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup मध्ये रविवारी भारत पाक सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांनी केलेल्या जाहीरातींनी सध्या वेगळीच टशन निर्माण केली आहे. 2015 च्या वर्ल्ड कपपूर्वी भारताने एक जाहिरात करून पाकिस्तानला डिवचलं होतं. त्यानंतर यावेळी पाकिस्तानने भारतीय नौदलाचा विंग कमांडर अभिनंदनसारखा दिसणाऱ्या अभिनेत्याला जाहिरातीमध्ये घेतलं. आपणच कप जिंकणार असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावरही भारताने प्रत्युत्तरादाखल बाप बाप होता है! सांगणारी जाहिरात केली.
आता भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचं एक जुनं ट्विट चर्चेत आलं आहे. 2017 मध्ये एका पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सेहवागने ट्विट केले होते. त्यात सेहवागने पोते के बाद बेटे, कोई बात नही बेटा, वेल ट्राय! असं म्हणत पाकिस्तानला टोला हाणत भारताचे विजयाबद्दल अभिनंदन केलं होते. तेव्हा त्याने बाप बाप होता है! असा हॅशटॅगही वापरला होता.
Pote ke baad Bete. Koi baat nahi Beta, Well tried ! Congratulations Bharat !#BaapBaapHotaHai #INDvPAK
— Virender Sehwag (@virendersehwag) June 4, 2017
सेहवागच्या ट्विटनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने तब्बल 15 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्याने अपशब्दही वापरले होते. त्यावेळी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं तर भारताला लंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा राशिदने सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या खेळाडूंचे वागणे चांगले होते पण सेहवाग मात्र त्यांच्यात नाही असं म्हटलं होतं.
पाकिस्तानी बशीर चाचाला मिळालं नाही तिकीट, धोनीच्या भरोशावर पोहोचला सामना बघायला!
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.
World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!
SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अॅडवॉर'