India Vs New Zealand : पावसाचे ढग, रद्द होणार सामना?

India Vs New Zealand : पावसाचे ढग, रद्द होणार सामना?

icc cricket world cup 2019 : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 3 सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.

  • Share this:

नॉटिंगहॅम, 11 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये आतापर्यंत तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असलेल्या नॉटिंगहॅम इथं भारताचा पुढचा सामना होणार आहे. न्यूझीलंड आणि भारताला सरावही करता आला नाही. येत्या दोन दिवसांत पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. असे झाल्यास भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द करावा लागण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कपच्या आधी झालेल्या सराव सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. वर्ल्ड कपमधील भारताने पहिले दोन तर न्यूझीलंडनेसुद्धा तीन सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 98 वेळा आमने सामने आले आहेत. यात 49 वेळा भारताने तर 43 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. एक सामना बरोबरीत सुटला तर 5 सामन्यांचा निकाल लागला नाही.

गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर रविवारी 16 जूनला पाकसोबत भारताचा सामना होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा साखळी फेरीतील सर्वात मोठा सामना असणार आहे. मँचेस्टरवर होणाऱ्या या सामन्यावरही पावसाचे पाणी फेरण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कपमध्ये 500 धावा होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यात कोणत्याच 400 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. इंग्लंडने सर्वाधिक 386 धावा केल्या. त्यांनी दोन वेळा 300 पेक्षा जास्त धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 352 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एका आठवड्यातच तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले. आगामी काही सामन्यांवरसुद्धा पावसाचे सावट आहे.

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

वाचा- बॅडमिंटनपटूला विराटच्या कोचने केलं क्रिकेटपटू, आता 'ती' खेळणार वर्ल्ड कप

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading