World Cup : गब्बर कधी खेळणार? विराटने दिली माहिती

ICC Cricket World Cup 2019 : भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. त्याच्या दुखापतीबद्दल विराट कोहलीने माहिती दिली.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 10:32 PM IST

World Cup : गब्बर कधी खेळणार? विराटने दिली माहिती

नॉटिंगहॅम, 14 जून : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडने पहिले तीन आणि भारताने पहिले दोन सामने जिंकले होते. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. मात्र, पावसाने सामना रद्द करण्याची वेळ आली. यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा चौथा सामना आहे जो पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताला आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे.

सामना रद्द झाल्यानंतर विराट कोहलीने आपण निराश झाल्याचं म्हटलं आहे. तरीही खेळाडूंच्या नजरेतून पावसाने ओलसर झालेल्या मैदानावर खेळणं योग्य नाही. त्यावर खेळल्यास खेळाडूंना पडून दुखापत होण्याची शक्यता असते. इतक्या मोठ्या स्पर्धेत दुखापत परवडणारी नाही.

सध्या भारतीय संघाला तरी यामुळे कोणती काळजी करण्याची गरज नाही. दोन विजयानंतर भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता पुढच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं विराटने सांगितलं. रविवारी 16 जूनला भारताचा पाकिस्तानशी सामना होणार आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने पुढचे काही सामने खेळू शकणार नाही. त्याबद्दल विराटला विचारले असता तो म्हणाला की, दोन आठवडे तरी त्याचे प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात खेळेल अशी आशा असल्याचं विराट म्हणाला.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

Loading...

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का


SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...