LIVE NOW

INDvsPAK : बाप बाप होता है! भारताचे पाकला सातवे आस्मान

ICC Cricket World Cup : पावसामुळे सामना 40 षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानला अखेरच्या 5 षटकांत 136 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं.

Lokmat.news18.com | June 17, 2019, 12:03 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated June 17, 2019
auto-refresh

Highlights

11:06 pm (IST)

सामना संपण्याआधी शाहीद आफ्रिदीने दिल्या भारताला विजयाच्या शुभेच्छा
 


Load More
मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cupमध्ये सुरु असलेल्या हायवोल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानला धावांचे 337 आव्हान दिले. पावसामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 षटकांत 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आलं मात्र त्यांचा खेळ 212 धावांवर आटोपला. भारताने 89 धावांनी विजय मिळवला.भारताला पहिलं यश मिळालं आहे. भुवनेश्वर कुमारचे पायांचे स्नायु अकडल्यामुळं त्याची ओव्हर विजय शंकरनं पूर्ण केली. त्याच्या 4 चेंडूवर शंकरनं इमानंला 7 धावांवर बाद केले.त्यानंतर फकर आणि बाबर या जोडीने शतकी भागिदारी केली. ही जोडी भारताच्या विजयाच डोकेदुखी ठरत असतानाच कुलदीपने 23व्या षटकात बाबरची विकेट घेत पाकला दुसरा दणका दिला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात पुन्हा एकदा कुलदीपने फकरला बाद करत पाकिस्तानची तिसरी विकेट घेतली. चायनामॅन कुलदीपच्या पाठोपाठ हार्दिकने मोहम्मद हाफिज आणि त्यानंतर शोएब मलिकला शून्यावर बोल्ड पाकिस्तानला दोन धक्के दिले. त्यानंतर विजय शंकरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजला बाद करत सहावा धक्का दिला. पावसानंतर खेळ 40 षटकांचा करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्माच्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 336 धावा केल्या. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. तर, त्यानंतर विराटनं 77 धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा फटका त्यांना बसला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित बाद झाला. त्यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया विरोधातही हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्यानं 48 धावांची तुफान खेळी केली होती. मात्र, या सामन्यात पांड्या केवळ 26 धावा करत बाद झाला. तर, दुसरीकडे कोहलीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तानला त्यांचा हा निर्णय महागात पडत आहे. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र केदार जाधव आणि विजय शंकर यांनी 22 धावा केल्या.
corona virus btn
corona virus btn
Loading