World Cup : पाकिस्तानी संघात दुफळी, कर्णधाराचेच कोणी ऐकत नाही!

ICC Cricket World Cup 2019 : पाकच्या संघात गटबाजी, पाकिस्तानी चॅनेलनं सांगितलं, भारताविरुद्धच्या सामन्यावेळी ड्रेसिंगरूममध्ये काय सुरू होतं?

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 04:54 PM IST

World Cup : पाकिस्तानी संघात दुफळी, कर्णधाराचेच कोणी ऐकत नाही!

मँचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून इतिहास कायम राखला. आतापर्यंत पाकिस्तानने भारताविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये एकदाही विजय मिळवलेला नाही. पाकिस्तानचे वर्ल्ड कपमध्ये चार पराभव झाले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानी माध्यमांनी संघावर जास्त टीका केली नव्हती. पण भारताविरुद्धच्या पराभवानंतर चक्क ड्रेसिंगरूममधलं वातावरण समोर आणलं आहे. भारतासोबत सामना असताना पाकच्या ड्रेसिंगरूममध्ये काय चाललं होतं ते तिथल्या माध्यमांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानी न्यूज चॅनेल समा न्यूजने खुलासा केला आहे की, यावेळी संघात गटबाजी सुरू आहे. दोन प्रमुख गट पडले असून त्यामध्ये कप्तान एका बाजूला पडला आहे. सर्फराज अहमद नावाला कर्णधार असून संघ वेगळ्याच दिशेनं जात आहे.

पाकमधील इतर माध्यमांनीसुद्धा संघात दोन गट पडल्याचं म्हटलं आहे. यात पहिला गट वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचा आहे. त्याला संघामध्ये आपला प्रभाव निर्माण करायचा आहे. मात्र त्याच्या विरोधात एक गट बनल्याने समस्या उभी राहिली आहे.

आमिरच्या विरोधात ग्रुप आहे तो इमाद वसीम याचा. पाकिस्तानचा मुख्य फिरकी गोलंदाज असलेल्या इमादने आमिरविरुद्ध वेगळा गट तयार केला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात दोन्ही गटातील वाद तेव्हा समोर आला जेव्हा ओल्ड ट्रॅफर्डवर पावसाने सामना थांबला होता. त्यावेळी मोहम्मद आमिरने चक्क कर्णधार सर्फराज अहमदवरच राग काढला होता.

समा चॅनेलनं भारत-पाक सामन्यावेळी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममधील काही गोष्टी समोर आणल्या आहेत. चॅनेलनं सांगितल्यानुसार सर्फराज बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्याने काही खेळाडूंवर राग काढल. यात इमाद वसीमच्या गटात असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.

Loading...

विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर एका पाकिस्तानी चाहता असलेल्या कलाकारानं सोशल मीडियावर मेसेज टाकला होता. त्यात म्हटलं होतं की, पाकिस्तानच्या संघात सध्या इमाद वसीम, शोएब मलिक आणि बाबर आझम ग्रुप चालवत आहेत. हे खेळाडू सर्फराजसमोर अडचणी निर्माण करत आहेत. एवढंच नाही तर त्यांना सर्फराजने नेतृत्व करणं पसंद नाही.

भारत पाक सामन्यावेळी पाकिस्तानी संघातील खेळाडूंची उदासिनता स्पष्ट दिसत होती. सामन्यावेळी सर्फराजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कर्णधार सर्फराज अहमद जांभई देत असलेला दिसत आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सर्फराजला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. अख्तरने म्हटलं की, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद बिनडोक आहे. त्याला डोकं नाही.

वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा-World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट


लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...