IND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ!

ICC Cricket World Cup 2019 क्रिकेटच्या मैदानावर भारत पाक सामना हा युद्धापेक्षा कमी नसतो. पण जर फाळणी झालीच नसती तर संघात 11 खेळाडू कोण आणि नेतृत्व कोणी केलं असतं?

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 03:50 PM IST

IND-PAK : फाळणी झाली नसती तर कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा असा असता संघ!

वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा सामना आज मँचेस्टरवर होत आहे. अनेकदा माध्यमातून भारत पाकिस्तान फाळणी झाली नसती तर भारताचा क्रिकेट संघ कसा असता याची चर्चा झाली आहे. खरंच जर असं झालं असतं तर जगात इतर कोणत्याही संघाचा यांच्यासमोर निभाव लागला नसता. भारत आणि पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या क्रिकेटपटूंचा एक संघ निवडला तर तो सर्वोत्तम असाच असेल.

भारत पाकिस्तान लढतीच्या पार्श्वभूमीव टाइम्स ऑफ इंडियाने एक संघ निवडला आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान एकच देश असता तर दोन्ही देशांपैकी भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सलामीवीर असता. त्याच्या फलंदाजीबद्दल आणि विक्रमांबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही.

दुसरा सलामीवीर म्हणून पाकिस्तानच्या सईद अन्वरचे नाव घेतले आहे. या जागी भारताचा स्फोटक फलंदाज सेहवागची स्पर्धा अन्वरशी होऊ शकते पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही प्रमाणात सईद वरचढ ठरतो.

Loading...

भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर योग्य असा फलंदाज आहे. भारत आणि पाकिस्तानच काय जगात तो तिसऱ्या क्रमांकाचा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे.

भारताला सध्या चौथ्या क्रमांकाची चिंता आहे. जर दोन्ही संघांतील चौथ्या क्रमांकासाठी कोणाची निवड करायची झाली तर जावेद मियादाद त्यासाठी योग्य ठरेल. त्याने अनेकदा भारताकडून विजय हिसकावून घेतला आहे. 1986 च्या ऑस्ट्रल आशिया कप स्पर्धेत फायनलला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवला होता.

  पाचव्या स्थानी नुकतीच निवृत्ती घेतलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे नाव घेता येईल. भारत पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात पाचव्या क्रमांकावर त्याची कामगिरी जबरदस्त अशीच राहिली आहे. 2007 मध्ये टी 20 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिगं धोनीला सर्वात य़शस्वी कर्णधार मानलं जातं. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या ड्रिम प्लेइंग इलेवनचा कर्णधार कोणी दुसराच असेल. धोनीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे.भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिगं धोनीला सर्वात य़शस्वी कर्णधार मानलं जातं. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या ड्रिम प्लेइंग इलेवनचा कर्णधार कोणी दुसराच असेल. धोनीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिगं धोनीला सर्वात य़शस्वी कर्णधार मानलं जातं. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या ड्रिम प्लेइंग इलेवनचा कर्णधार कोणी दुसराच असेल. धोनीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे.

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचे कर्णधार कपिल देव सुद्धा या संघात असतील. त्यांना कर्णधार म्हणून नाही मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणून टाइम्सने संघात स्थान दिलं आहे.

वेगवान गोलंदाजीत शोएब अख्तरला स्थान न देता वसीम आक्रमला संघात निवडलं आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा आक्रमकडे सोपवण्याचा विचार करण्यात आला आहे.

वसीम आक्रमशिवाय वकार युनुसलासुद्धा संघात स्थान दिलं आहे. उसळत्या चेंडूचा मारा करण्याची कला त्याच्याकडे आहे.

फिरकीपटू म्हणून पाकिस्तानच्याच सकलेन मुश्ताकचं नाव टाइम्सने घेतलं आहे.  हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांनाही स्थान मिळू शकलं असतं. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सकलेन मुश्ताक सर्वात धोकादायक फिरकीपटू होता.

भारत-पाक यांच्यातील फाळणी न झालेल्या स्वप्नातील संघाचे नेतृत्व पाकचे सध्याचे पंतप्रधान आणि माजी अष्टपैलू खेळाडू इम्रान खान यांच्याकडे असावं असं टाइम्सने म्हटलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व कामगिरी करत 1992 चा वर्ल्ड कप जिंकला होता.

दोन्ही देश एकत्र असते तर संघाची निवड करणं कठीण झालं असतं असं टाइम्सने म्हटलं आहे. या संघात विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, अब्दुल कादीर, इंजमाम उल हक हे सुद्धा स्थान मिळवू शकतात आणि त्यांच्यात क्षमता असल्याचंही टाइम्सने लिहलेल्य लेखात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...