World Cup 2019 मध्ये शमीची पहिली हॅट्ट्रिक, पाहा VIDEO

World Cup 2019 मध्ये शमीची पहिली हॅट्ट्रिक, पाहा VIDEO

ICC Cricket World Cup : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिकसह भारताला विजय मिळवून दिला.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup भारताने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. त्यांना 213 धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद शमीच्या हॅट्ट्रिकने भारताला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. त्यापूर्वी बुमराह, पांड्या आणि चहलने टिच्चून मारा केला. बुमराहने एकाच षटकात दोन गडी बाद करून मधल्या फळीला खिंडार पाडले. त्यानंतर अखेरच्या षटकांत फक्त यॉर्करवर भर देत त्याने अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर दबाव आणला.

अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. मोहम्मद नबीने शमीच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक तर केलंच पण त्याने अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर नबीचा हार्दिक पांड्याने झेल घेतला. नबीने सर्वाधिक 52 धावा केल्या. चौथ्या चेंडूवर शमीने अफताब आलमचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. पाचव्या चेंडूवर मुजीब उर रहमानचा त्रिफळा उडवून हॅट्ट्रिकसह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला. अफगाणिस्तानकडून रहमत शाह आणि मोहम्मद नबीने सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर बुमराह, चहल आणि पांड्याने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर शमीने एक गडी बाद केला.

225 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची एकवेळ 2 बाद 106 अशी मजबूत स्थिती झाली होती. मात्र, बुमराहने एकाच षटकात रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदीला बाद करून सलग दोन धक्के दिले. त्यानंतर ठराविक अंतराने अफगाणिस्तानचे गडी बाद होत गेले. अखेरच्या षटकात मोहम्मद नबीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने संघाला 200 धावा करून दिल्या.

Loading...

तत्पूर्वी, भारतानं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. त्यामुळं दोन शतक आणि एक अर्धशतकी खेळणारा रोहित शर्मा एका धावावर बाद झाला. त्यानंतर राहुल आणि विराट यांनी अर्धशतकी भागिदारी केली, मात्र राहुल 30 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी विराट कोहलीनं 48 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विजय शंकर आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी भागिदारीनंतर विजय शंकर 30 धावांवर बाद झाला, त्यानंतर विराट कोहली 67 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही. धोनी 28 धावांवर बाद. त्यानंतर फलंदाजांची रांग लागली. हार्दिक पांड्या 7 धावांवर तर, शमी केवळ 1 धावा करत बाद झाला. तर, केदार जाधव अर्धशतकी खेळी करत बाद झाला. अफगाणिस्ताकडून मोहम्मह नबीनं चांगली गोलंदाजी केली. त्यानं आपल्या 9 ओव्हरमध्ये 33 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, इतर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. त्यामुळं भारतानं 224 धावांपर्यंत मजल मारली.

वाचा- पंतने केला खुलासा, World Cup संघात नाव नाही हे समजल्यावर काय केलं

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 02:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...