World Cup : रिषभऐवजी कार्तिकच्या निवडीबद्दल विराटने सोडलं मौन

World Cup : रिषभऐवजी कार्तिकच्या निवडीबद्दल विराटने सोडलं मौन

भारताच्या वर्ल्ड कप संघात रिषभ पंतची निवड न झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ला सुरुवात होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 22 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. यासाठी 15 एप्रिल रोजी भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीला मुख्य यष्टीरक्षक निवडले तर राखीव यष्टीरक्षक म्हणून पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. यानंतर अनेकांनी या निवडीवर प्रश्न उपस्थित केले. या मुद्द्यावर अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. आता विराट कोहलीने याबाबत मौन सोडलं आहे.

विराट कोहलीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, दिनेश कार्तिक तणावपूर्ण परिस्थितीत खेळू शकतो. याबाबतीत कार्तिक रिषभ पंतच्याबाबतीत वरचढ ठरला. कार्तिक महत्त्वाच्या सामन्यात संयमाने खेळू शकतो. जर धोनी एखाद्यावेळी खेळू शकला नाही तर कार्तिक त्याची जबाबदारी निभावू शकेल असं विराटने म्हटलं.

संघ जाहीर करताना निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, धोनी मुख्य यष्टीरक्षक आहे आणि तो सर्व सामन्यात खेळणार आहे. तो अनफिट असेल तेव्हाच कार्तिकला संधी मिळेल असं म्हटलं होतं. तसेच कार्तिकला अनुभवाच्या जोरावर संघात घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्मवरून अनेक जण टीका करत आहेत. या टीकाकारांनाही कोहलीनं उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, धोनीसाठी संघापेक्षा कोणतीही मोठी गोष्ट नाही. माझ्याइतकं धोनीला खूप कमी लोक ओळखतात. त्याचा अनुभव आम्हाला मदत करतो. त्याचं यष्टीरक्षण सामन्याचं चित्र बदलणारं असतं असं त्याने सांगितलं.

वाचा : रक्तबंबाळ होऊनही खेळलेल्या वॉटसनचा हा VIDEO पाहुन तुम्हीही व्हाल भावुक

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!