World Cup : भारताचा हा 'कच्चा दुवा' ठरणार डोकेदुखी?

भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात असलं तरी अजुनही विराटसेनेसमोर अडचणी आहेत.

  • Share this:

क्रिकेटच्या महासंग्रामाला इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असला तरी भारतीय संघासमोर चौथ्या क्रमांकाची मोठी अडचण आहे.

गेल्या वर्ल्ड कपपासून भारताने नंबर चारसाठी वेगवेगळ्या खेळाडूंची चाचपणी केली. वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या दहा संघांमध्ये भारत आणि श्रीलंकेनं सर्वाधिक 12 खेळाडू या क्रमांकावर खेळवले.

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडने 5 फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर उतरवलं तर न्यूझीलंडने 9 खेळाडूंना संधी दिली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 9 शतकांसह 3 हजार 494 धावा केल्या.

भारताने चौथ्या क्रमांकावर 4 वर्षात 12 खेळाडू उतरवल्यानंतरही फक्त 2 हजार 411 धावा केल्या. यात फक्त 3 शतके झाली तर सध्याच्या संघातील 6 खेळाडू गेल्या 4 वर्षांत चौथ्या क्रमांकावर खेळले. मात्र, यापैकी कोणालाच शतक करता आलं नाही.

भारताने संघ जाहीर केला असला तरी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. अनेक दिग्गजांनी लोकेश राहुल यासाठी योग्य असल्याचं म्हटंल आहे. याशिवाय विजय शंकर आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघेही पर्याय ठरू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या