INDvsPAK : नशीब असावं तर विजय शंकरसारखं नाहीतर काहीच नसावं!

ICC Cricket World Cup 2019 : India vs Pakistan : भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरने वर्ल्ड कपमधील त्याची पहिली विकेट घेतली.

  • Share this:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली. विशेष म्हणजे त्याला भुवनेश्वर कुमारचे अर्धवट षटक पूर्ण करण्यासाठी चेंडू सोपवण्यात आला होता.

पाचव्या षटकातील पहिले चार चेंडू टाकल्यानंतर पायाचे स्नायू दुखावल्यानं भुवनेश्वर कुमारने मैदान सोडलं. त्यानंतर पुढचे दोन चेंडू टाकण्यासाठी विजय शंकरला पाचारण करण्यात आलं होतं. तेव्हा विजयने त्याच्या पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला बाद केलं. ही त्याची वर्ल्ड कपमधील पहिली विकेट ठरली. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नशीब असावं तर विजय शंकरसारखं असं म्हटलं आहे. असं म्हणण्यामागे कारणही तसंच आहे.

विजय शंकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेसुद्धा अचानकच झालं होतं. पांड्या आणि राहुलवर बंदीची कारवाई झाल्यावर त्याला संधी मिळाली होती.

आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेतली जाणार नाही असं जरी निवड समितीने म्हटलं असलं तरी विजय शंकरची निवड अंबाती रायडुच्या जागी झाली आहे. रायडुची आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक होती. ती विजय शंकरच्या पथ्यावर पडली.

वर्ल्ड कपच्या संघात असलेल्या विजय शंकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. धवनला दुखापत झाल्यानंतर विजय शंकर अंतिम अकरामध्ये आला होता. त्यानंतर आजच्या सामन्यातही अचानक गोलंदाजी मिळाली तीसुद्धा भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीने.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या