IND Vs PAK : कोण असतील 11 शिलेदार? चौथ्या क्रमांकावर 'या' खेळाडूला संधी

ICC Cricket World Cup 2019 : ind vs pak : भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने खेळू शकणार नसल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार आणि चौथ्या क्रमांकावर कोण असा प्रश्न आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup 2019 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला रविवारी सामना होणार आहे. मँचेस्टरमध्ये होणाऱ्या या सामन्याची फक्त भारत पाकिस्तानचेच नाही तर जगभरातील क्रिकेट प्रेमी वाट बघत आहेत.

दरम्यान भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एक धक्का बसला. सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने किमान दोन आठवडे तो खेळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला घ्यायचं आणि पुन्हा चौथ्या क्रमांकावर कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्टँडबायला असलेल्या रिषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आलं असलं तरी त्याला अद्याप संघात घेतलं नाही. शिखर धवन फिट झाला नाही तर रिषभ पंतला संघात स्थान मिळेल.

रोहित शर्मासोबत सलामीला केएल राहुल मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रोहितने एक शतक झळकावलं असून सध्या केएल राहुलसुद्धा फॉर्ममध्ये आहे.

भारतासमोर पुन्हा चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न उभा राहिला आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास दिनेश कार्तिक किंवा विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते.

मधल्या फळीत महेंद्रसिंग धोनी आणि हार्दीक पांड्या अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. तर केदार जाधव सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

शेवटी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. ओल्ड ट्रॅफर्डवर वेगवान गोलांदाजांना अनुकुल खेळपट्टी असल्याने संघात युझवेंद्र चहलला सामिल करून कुलदीप यादवला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या