VIDEO : INDvsPAK - माकड उड्या... इशारे आणि शाब्दिक चकमक, पाहा कट्टर प्रतिस्पर्ध्यांची खुन्नस

VIDEO : INDvsPAK - माकड उड्या... इशारे आणि शाब्दिक चकमक, पाहा कट्टर प्रतिस्पर्ध्यांची खुन्नस

ICC Cricket World Cup 2019 : Indvspak : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात अनेकदा दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्य़ा भारत आणि पाक यांच्यातील सामना 16 जूनला मँचेस्टरमध्ये होणार आहे. या सामन्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सामन्यात एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. जेव्हा जेव्हा भारत पाक आमने सामने आले आहेत तेव्हा अनेकदा प्रतिस्पर्धी संघातील खेळा़डूंमध्ये शाब्दिक चकमकी, डिवचण्याचे प्रकार घडले आहेत. यात सर्वात जास्त लक्षात राहणारी घटना म्हणजे जावेद मियाँदादने मारलेल्या माकड उड्या. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यष्टीरक्षक किरण मोरेने वारंवार केलेल्या अपिलमुळे चिडल्यानंतर जावेद मियाँदादने माकड उड्या मारल्या होत्या. तो सामना भारताने जिंकला होता.

1996 च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात पाकचा फलंदाज आमीर सोहेलने भारताच्या वेंकटेश प्रसादला डिवचले होते. प्रसादच्या गोलंदाजीवर आमीर सोहेलने चौकार मारून पुढचा चेंडूसुद्धा असाच मारेन असा इशारा केला. पण प्रसादने त्याचा त्रिफळा उध्वस्त करून चोख प्रत्युत्तर दिलं.

वर्ल्ड कपशिवाय इतर स्पर्धेतही दोन्ही संघातील सामन्यावेळी झालेले वाद गाजले. यात 1997 ला कॅनडात झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानचा क्रिकेटपटू इंझमाम उल हकला आलू आलू! असं चिडवण्यात आलं. त्यावेळी भडकलेला इंझमाम चक्क प्रेक्षकांच्या अंगावर धावून गेला होता. त्यानंतर इंझमामवर कारवाई करत दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.

1998 ला इंजिपेंडन्स कप स्पर्धेत कमी प्रकाशामुळे भारत पाक सामना थांबवण्यात आला होता. सर्व पाकिस्तानचे खेळाडू मैदानातून बाहेर गेले तरी अझरुद्दीन मैदानावर ठाण मांडून बसला होता. शेवटी पाकच्या संघाला पुन्हा मैदानावर बोलवावे लागले. हा सामना भारताने जिंकला.

शांत आणि संयमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या राहुल द्रविडनेसुद्धा पाकिस्तानविरुद्ध राग काढला होता. 2004 ला झालेल्या एका सामन्यात अख्तरच्या गोलंदाजीवर धाव घेत असताना द्रविडची धडक झाली. तेव्हा अख्तर मुद्दाम आपल्या वाटेत आल्याचं म्हणत राहुल द्रविडने बरेच सुनावले होते.

2007 ला झालेल्या एका सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात जोरदार चकमक झाली. गंभीरने आफ्रिदीला चौकार मारल्यानंतर दोघांची बाचाबाची झाली. त्यानंतर धाव घेताना दोघेही धडकले आणि वातवरण गरम झाले. यावेळी वेळीच पंचांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.

गौतम गंभीरचा चिडखोर स्वभाव पुन्हा एकदा 2010 मध्ये दिसला. पाकचा यष्टीरक्षक कामरान अकमलच्या वारंवार अपिल केल्याने गंभीर चिडला. तेव्हा गंभीरने कामरानला ड्रिंक्स ब्रेकवेळी फैलावर घेतले. त्यावेळी धोनीने दोघांमधला वाद मिटवला.

आशिया कप स्पर्धेत हरभजन आणि शोएब अख्तर यांच्यातही चकमक झाली होती. हरभजनने दोन षटकार खेचून सामना भारताच्या बाजूने झुकवला होता. तेव्हा शोएब अख्तरने अपशब्द वापरले होते. त्यानंतर चिडलेल्या हरभजनने फटकेबाजी करत मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला होता.

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने 2017 मध्ये एक टि्वट केलं होतं. त्यात बाप, बाप होता है असं म्हटल्यानंतर पाकिस्तानच्या राशिद लतिफने चिडून तब्बल 15 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला होता.

India Vs Pakistan : काळाबाजार तेजीत, एका तिकीटाची 'इतकी' किंमत!

World Cup : भारताविरुद्ध पाकिस्तानचा खेळाडू वापरणार 'विराट'अस्त्र

World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!

SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अ‍ॅडवॉर'

First published: June 15, 2019, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading