बर्मिंगहम, 30 जून : ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात भारताला सेमीफायनलचं स्थान पक्क करण्यासाठी तर इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय गरजेचा आहे. दरम्यान सामन्यापूर्वी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करेन असं चॅलेंज दिलं होतं.
मोईन अली म्हणाला होता की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघ दबावाखाली असेल. विराट कोहलीला माहिती आहे की त्याला धावा करायच्या आहेत. तर मी इकडे त्याला बाद करण्याच्या तयारीत आहे. विराटला बाद करूनही आपण त्याचा मित्र म्हणून कायम राहता येतं. विराटला मी अंडर 19 मध्ये खेळत असल्यापासून ओळखतो असंही मोईन अलीने सांगितलं होतं. मोईन अली 2018 आणि 2019 मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे.
विराटला बाद करेन असं मोईन अली म्हणाला पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. इंग्लंडने संघात दोन बदल केले असून जेसन रॉय आणि लियाम प्लंकेटला संघात घेतलं आहे. त्यांना मोईन अली आणि जेम्स विन्सच्या जागी घेतलं आहे. आता मोईन अलीच संघाबाहेर असल्यानं त्यानं विराटला दिलेलं चॅलेंज वाया गेलं.
एकदिवसीय आणि टी20 मोईन अलीने विराट कोहलीला आतापर्यंत 7 वेळा बाद केलं आहे. मोईनने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विंडीजच्या ब्रेथवेटला 8 वेळा बाद केलं आहे. मोईनने भारतीय फलंदाजांना कसोटीत जास्त वेळा बाद केलं आहे. त्याने कसोटीत भारताविरुद्ध 41 विकेट घेतल्या आहेत.
वर्ल्ड कपमध्ये विराटचे रनमशिन धावांचा पाऊस पाडत आहे. विराटने आतापर्यंत चार अर्धशतकांसह 316 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइकरेट 98.44 असा आहे. तर इंग्लंडच्या मोईन अलीला आतापर्यंत फारशी चमक दाखवता आलेली नाही. गोलंदाजीत त्याने फक्त 5 बळी घेतले असून फलंदाजी करताना 75 धावा केल्या आहेत.
VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा