लंडन, 14 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेतील जवळपास अर्धे सामने होत आले आहेत. पहिल्या 18 सामन्यांपैकी 4 सामने पावसाने रद्द झाले. त्यानंतर आयसीसीवर चाहत्यांनी टीकेची झोड उठवली जात आहे. गुरुवारी भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे सर्वाधिक सामने रद्द झाले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पॉईंट टेबलमध्ये सर्वाधिक सामने जिंकलेल्या संघापेक्षा पावसामुळे वाया गेलेल्या सामन्यांचे गुण अधिक होतात.
सामने रद्द होण्याचा परिणाम संघांच्या गुणतक्त्यातील स्थानावर होत आहे. सध्या पाकिस्तान, श्रीलंका, भारत, न्यूझीलंड यांना एक एक गुण सामना रद्द झाल्याने मिळाला. ज्यावेळी हे संघ सेमीफायनलला स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करतील तेव्हा हे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. यात पावसामुळे गमावलेले गुण संघाला स्पर्धेतून बाहेर ढकलू शकतात.
रॉबिन राउंड पद्धतीने सामने होत असल्याने प्रत्येक संघाला 9 सामने खेळता येणार आहेत. यात 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवणारा संघ पुढच्या फेरीत पोहचू शकतो. पण आता पावसाने सगळंच गणित बिघडवलं आहे.
वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने 3 सामन्यातील विजयासह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताविरुद्धचा सामना रद्द झाल्याने एक गुण मिळाला. त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत दोन विजय आणि पावसाने रद्द झालेल्या सामन्यातील एक गुण असे मिळून 5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
World Cup : ज्या देशात पाऊस पडतो त्यांना आयसीसीने यजमानपद का दिलं?
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने तीन पैकी दोन सामने जिंकले असून 4 गुणांसह ते चौथ्या स्थानावर आहेत. लंकेने एका सामन्यात विजय, दोन सामने पावसामुळे वाया गेले. तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे तीन गुण झाले आहेत. या तीनही संघांना पावसाचा फटका बसला आहे. हे संघ अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिकेला तीन पराभव पत्करावे लागले त्यानंतर एका सामन्यात पावसाने त्यांना एक गुण मिळाला. अफगाणिस्तानला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
ICC तुम्हाला जमणार नाही असे भरवा सामने, भडकलेल्या चाहत्यांनी सुचवले भन्नाट उपाय
वर्ल्ड कपमधील पुढचे सर्व सामने जर पावसाने रद्द झाले तर वर्ल़्ड कपचा निकाल आताच लागेल. विजेतेपद दोघांमध्ये विभागून द्यावं लागेल. न्यूझीलंड 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचे सामने न झाल्यास उरलेल्या 5 सामन्यांचे 5 गुण त्यांच्या खात्यात जमा होतील आणि 12 गुणांसह ते अव्वल राहतील. भारत सध्या 5 तिसऱ्या क्रमांकावर असला तरी शिल्लक राहिलेले सामने 6 असल्याने भारत 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर जाईल. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर येतील.
रॉबिन राउंड पद्धतीने सेमिफायनलला पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांचा सामना होईल. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघामध्ये सामना होईल. या दोन्हीतील विजेत्या संघाला फायनलला तिकीट मिळेल. या सामन्यांमध्ये पाऊस झाल्यास गुणतक्त्यात अव्वल असलेल्या संघांना विजेता घोषित केलं जाईल. म्हणजेच सर्व सामने रद्द झाल्याने पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या न्यूझीलंड आणि भारताचा फायनलला सामना होईल.
If all remaining get washed :
— Mithun (@Mithun_MDU) June 14, 2019
NZ - 12
Ind - 11
Eng - 10
Aus - 10
WI - 9
SL - 9
Pak - 9
Bang - 8
SA - 6
Afg - 6
Semi Final
Aus vs NZ
(If rain continues), NZ
Eng vs Ind
(If rain continues), Ind
Final
Ind vs NZ
(If rain continues), NZ - India will win jointly . #ShameOnICC
स्पर्धेच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत पावसाचा खेळ सुरूच राहिला आणि जर तो फायनललाही थांबला नाही तर तो सामना रद्द होईल. या सामन्यात भिडणाऱ्या दोन्ही संघाना विजेता घोषित केलं जाईल. भारत आणि न्यूझीलंडच्या रद्द झालेल्या सामन्यानंतर जर वर्ल्ड कपमधील पुढचे सर्व सामने रद्द झाले तर अशा प्रकारे वर्ल्ड कपचा निकाल लागू शकतो. यानुसार भारत आणि न्यूझीलंडला संयुक्त विजेतेपद मिळेल. ट्विटरवर चाहत्यांनी भारत आणि न्यूझीलंडचे विजेतेपदाबद्दल आधीच अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
बुमराहला या अभिनेत्रीने केलंय क्लीन बोल्ड? पाहा कोण आहे ती!
उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी