S M L

'या' दोन देशातील युद्धामुळे पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला उशिर

1973 मध्ये महिलांचा वर्ल्ड कप झाला होता तेव्हाच पुरुषांच्या वर्ल्ड कपच्या आयोजनावर चर्चा झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी 1975 ला पहिला वर्ल्ड कप खेळण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 09:01 AM IST

'या' दोन देशातील युद्धामुळे पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला उशिर

मुंबई, 22 मे : इंग्लंडमध्ये 30 जूनापासून सुरु होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ रवाना झाला. वर्ल्ड कपची सध्याची क्रेझ आणि जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हाची क्रेझ यात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये रंगतदार सामने, ऐतिहासिक खेळी याबद्दल अनेक किस्से सांगितले जातात.

क्रिकेटमध्ये आता पुरुषांसोबत महिलांचे क्रिकेटही लोकप्रिय होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? पुरुषांच्या अगोदर महिलांचा क्रिकेट वर्ल्ड कप खेळण्यात आला होता. 1973 मध्ये झालेल्या या वर्ल्ड कप फायनलच्या 3 दिवस आधी एका बैठकीत पुरुषांच्या वर्ल्ड कपला मंजुरी देण्यात आली होती.

वर्ल्ड कप म्हणजे काय हेच माहिती नव्हतं


पहिल्या वर्ल्ड कपच्या आठवणी सांगताना पाकिस्तानचे क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी म्हटलं होतं की, त्यावेळी वर्ल्ड कप म्हणजे काय हेच आम्हाला माहिती नव्हतं. त्यात भाग घेणाऱ्या देशांनासुद्धा त्याचं महत्त्व माहिती नव्हतं. क्रिकेटचा जनक असलेल्या इंग्लंडला एकदाही विश्वचषक जिंकला आलेला नाही.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं आयोजन ढकललं पुढे

1972 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या आयोजनाची चर्चा झाली होती. मात्र, यात अडचण होती ती दोन देशांची. भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध 1965 च्या युद्धामुळे ताणले गेले होते. अशावेळी दोन्ही देशांनी वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास नकार दिला तर कसोटी खेळणारे फक्त चार देश उरतील. यामुळे आयसीसीने आपला विचार पुढे ढकलला.

Loading...

महिलांचा वर्ल्ड कप सुरु असताना आयसीसीने 25 जुलै 1973 ला एक बैठक घेतली. यात पुरुषांच्या वर्ल्ड कपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यावेळी इंटरनॅशनल टूर्नामेंट असं डेली एक्सप्रेसन म्हटलं होतं. मात्र, आयसीसीने या स्पर्धेला 'वर्ल्ड कप' असं नाव दिलं.

एक दिवस आधी पोहोचले होते संघ

वर्ल्ड कपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खरी समस्या होती ती पैशांची. यासाठी आयसीसीनं टेस्ट अॅण्ड काउंटी क्रिकेट बोर्डाला (टीसीसीबी)स्पर्धेच्या आय़ोजनाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी 15 कोटी इतका खर्च या स्पर्धेसाठी ठरवला होता. मात्र, 1974 पर्यंत टायटल स्पॉन्सर मिळाला नाही. तेव्हा प्रसारण हक्क आणि प्रायोजकत्व यातून आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रुडेंशियल या अमेरिकन विमा कंपनीने प्रायोजकत्व घेतलं आणि वर्ल्ड कपला प्रुडेंशियल कप असं नाव दिलं. पहिल्या वर्ल्ड कपसाठी सर्व संघ एक दिवस आधी पोहोचले होते.

कॅलिप्सो क्रिकेटर्सनी जिंकला पहिला वर्ल्ड कप

1975 ला खेळण्यात आलेल्या पहिल्या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावून वेस्ट इंडिजने क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांत कोरलं. त्याआधी 1970 च्या दशकात क्रिकेटमध्ये दोनच देशांचं वर्चस्व होतं. ते दोन देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. वेस्ट इंडीज म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर खेळणारा देश एवढीच ओळख होती. ते जिथंही जायचे तिथं त्यांना मनोरंजन करायला कॅलिप्सो क्रिकेटर्स आले असं म्हटलं जायचं. विंडीजने आपली ओळख बदलून दाखवली नाही तर थेट पहिल्या वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. क्लाईव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्ल्ड कप त्यांनी जिंकले.

बलाढ्य वेस्ट इंडीजला पराभूत करून भारत झाला जग्गजेता

वेस्ट इंडीजची वर्ल्ड कप विजेतेपदाची हॅट्ट्रिक भारतामुळे हुकली. भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिलं विजेतेपद पटकावलं. यानंतर भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढली. त्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉम्बेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांच्या एका खेळीनंतर भारताने इतिहास रचला होता. कपिल देव फलंदाजीला मैदानात उतरले तेव्हा भारताच्या 4 बाद 9 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कपिल देव यांनी 138 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि 6 षटकार मारले. हा सामना भारताने जिंकल्यानंतर 7 दिवसांनी भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करून जग्गजेतेपद पटकावलं.

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा

1999 ते 2007 पर्यंत क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने आपलं वर्चस्व राखलं. त्यांनी सलग तीन वर्ल्ड कप जिंकले. 1999 ला पाकिस्तानला तर 2003 मध्ये भारताला पराभूत केलं होतं. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 8 सामने जिंकून फायनलला धडक मारली होती. मात्र, फायनलला कांगारूंसमोर भारताचा खेळ बिघडला.

प्रुडेंशियल कपला अधिकृत 'वर्ल्ड कप' असं नाव दिल्यानंतर 1987 ते 1999 या दरम्यान 4 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकेवेळी नवा विजेता मिळाला. 1987 ला ऑस्ट्रेलिया, 1992 ला पाकिस्तान, 1996 ला श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर 1999 ला पुन्हा ऑस्ट्रेलिया जग्गजेता झाला.

गेल्या दोन वर्ल्ड कपमध्ये 2011 ला भारताने तर 2015 ला ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावलं. यात दोन्ही देशांनी मायदेशात अंतिम सामना जिंकण्याची कामगिरी केली. 2011 मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला. तर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून पाचव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं.


VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 08:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close