कपिल देव, युवराज यांच्यानंतर आता 'हा' खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप

कपिल देव, युवराज यांच्यानंतर आता 'हा' खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप

इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विजेतेपदाचा दावेदार मानलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सर्वात जास्त संतुलित असून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावलं होतं. यात त्यांनी झिम्बॉम्बेविरुद्ध केलेली 175 धावांची खेळी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. 1983 नंतर 1987 च्या वर्ल्ड कपमध्येही कपिल देव यांनी नेतृत्व केलं होतं. यात त्यांनी कर्णधार म्हणून 15 सामने खेळले होते. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीनेच भारत विश्वविजेता ठरला होता. कपिल देव यांनी 455 धावा आणि 17 विकेट घेतल्या होत्या.

भारताला पहिल्या विजेतेपदानंतर दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तब्बल 28 वर्षे 2011 पर्यंत वाट पहावी लागली. त्यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या भारताने पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. यात युवराज सिंगने एका षटकात मारलेले सहा षटकार लोकांच्या स्मरणात आहेत.  या स्पर्धेत त्याने 6 सामन्यात 148 धावा केल्या होत्या.

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2011 मध्ये पुन्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा एकदिवसीय जेतेपद पटकावलं.  यात भारताच्या जेतेपदात युवराज सिंगने मोलाची कामगिरी केली. त्याने मालीकावीर पुरस्कारही पटकावला होता. युवराजने अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत 362 धावा आणि 15 विकेट घेतल्या होत्या.

आताच्या भारतीय संघातही कपिल देव आणि युवराज सिंग यांच्या प्रमाणेच अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जातं. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर पांड्या दुखापतीने संघातून बाहेर होता. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यात 402 धावा केल्या तर 14 विकेटसुद्धा घेतल्या आहेत.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात पांड्याची कामगिरी महत्त्वाची ठरू शकते.  पांड्याबाबत बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही कौतुक केलं आहे. पांड्याची कामगिरी पाहता त्याच्या तोडीचा एकही खेळाडू भारतीय संघात नसल्याचं सेहवागने म्हटलं आहे.

वाचा : रक्तबंबाळ होऊनही खेळलेल्या वॉटसनचा हा VIDEO पाहुन तुम्हीही व्हाल भावुक

First published: May 16, 2019, 1:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading