धोनीच्या खेळाबद्दल हरभजनने दिला संघ व्यवस्थापनाला सल्ला

धोनी आणि हार्दिक पांड्याच्या खेळाबद्दल हरभजनसिंगने मत व्यक्त करताना चौथ्या क्रमांकावर कोण योग्य हेसुद्धा सांगितलं.

  • Share this:

भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 22 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. सध्या त्याच्या फलंदाजीवरून टीका केली जात आहे. याबद्दल फिरकीपटू हरभजन सिंगने धोनीबाबत संघ व्यवस्थापनाला सल्ला दिला आहे.

महेंद्रसिंग धोनीमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्याला स्वातंत्र्य द्यायवा हवे असं हरभजनसिंगने म्हटलं आहे. त्याच्या शैलीत खेळताना अनेकदा संघाला फायदा झाला आहे. आता त्याला सुरुवातीपासून फटकेबाजी करण्याची मुभा द्यायला हवी असं मत हरभजनने व्यक्त केलं आहे.

धोनीला पाचव्या क्रमांकावर पाठवून त्याला त्याच्या मनाने खेळ करू द्यावा. तसेच हार्दिक पांड्यालासुद्धाच त्याचा नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक द्यावी असे हरभजनसिंगने म्हटले आहे.

Loading...

आघाडीच्या फळीत शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल भारताला चांगली सुरुवात करून देतील. मधल्या फळीत धावगती वाढवण्यासाठी धोनी उपयुक्त ठरेल असं हरभजनने म्हटले.

हरभजन सिंगनेसुद्धा चौथ्या क्रमांकाबद्दल चिंता व्यक्त करताना केएल राहुलशिवाय दुसरा योग्य पर्याय नसल्याचं म्हटलं आहे.

गोलंदाजीत बुमराहने चांगला ठसा उमटवला असून तो भारतीय संघातील गोलंदाजीतला कोहली असल्याचं हरभजन म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...