World Cup : रोहित आणि विराटसाठी धोक्याची घंटा, वर्ल्ड कपमध्ये वापरला जातोय वेगळाच चेंडू

या चेंडूमुळं भारताच्या सलामी आणि मधल्या फळीच्या फलंदाजांच्या अडचणी वाढणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 08:32 AM IST

World Cup : रोहित आणि विराटसाठी धोक्याची घंटा, वर्ल्ड कपमध्ये वापरला जातोय वेगळाच चेंडू

लंडन, 07 जून : सध्या ICC World Cup सध्या प्रत्येक संघाच्या सलामीच्या फलंदाजांना धावा करण्यास कठिण जात आहे. त्यामुळं अजूनपर्यंत एकाही सामन्यात चांगली सलामीची भागीदारी झालेली नाही. त्यामुळं गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीची चर्चा तर होत आहेच पण आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानं सध्या सुरु असलेल्या World Cupमध्ये चिकनी कुकाबूरा नावाचा चेंडू वापरला जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळंच चेंडू जास्त चांगला स्विंग होतो. याचा प्रत्यय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यातही पाहायला मिळाला.

चिकनी कुकाबूरा या चेंडूमुळं गोलंदाजांना जास्त स्विंग मिळते. त्यामुळं फलंदाजांसाठी ही धोक्याची घंट असणार आहे, असेही म्हटले जात आहे. त्यातच वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यातही बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेत भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली. तर, दक्षिण आफ्रिकेकडून रबाडानं चांगली गोलंदाजी केली. मात्र या सामन्यात भारताची बाजू जास्त वरचढ होती. दरम्यान आता भारताचा पुढील सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी विकेट ऑस्ट्रेलियाच्या जलद गोलंदाजांसमोर पडू शकते.

स्टार्क भारतासाठी धोकादायक

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यात भारताची सलामी डोकेदुखी वाढवू शकते. कारण स्टार्कच्या गोलंदाजीपुढं भारतीय फलंदाज टिकाव धरु शकतील हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान चिकनी कुकाबूरा या चेंडूचा फायदा मिशेल स्टार्क या जलद गोलंदाजांला होऊ शकतो. स्टार्कला स्विंगचा बादशहा म्हटले जाते, त्यामुळं भारताच्या टॉप ऑर्डरला याचा त्रास होऊ शकतो. भारताच्या खेळाडूंसाठी उजव्या हाताचे गोलंदाज डोकेदुखी ठरु शकतात.

रोहितचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा

Loading...

दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या पहिल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. रोहित शर्माच्या नाबाद 122 धावांच्या खेळीमुळं भारतानं दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघात एकही गोलंदाज उजव्या हाताचा नव्हता. त्यामुळं ऑस्ट्रेलिया विरोधात रोहित शर्माला सावध फलंदाजी करावी लागणार आहे.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले


SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, आयसीसीचा काय आहे आक्षेप?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 08:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...