World Cup : विराटसेनेला वर्ल्ड कप जिंकण्यापासून रोखू शकतात 'हे' 3 संघ, सेमीफायनलच्या चार टीम निश्चित

9 जुलैपासून नॉक आऊट सामने सुरु होणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 12:05 PM IST

World Cup : विराटसेनेला वर्ल्ड कप जिंकण्यापासून रोखू शकतात 'हे' 3 संघ, सेमीफायनलच्या चार टीम निश्चित

लंडन, 21 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सर्व संघाचे लीग स्टेजमधले सामने संपत आल्यामुळं सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्व संघानी आपले पाच सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशला नमवल्यानंतर कमकुवत संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळं हे संघ सेमीफायनलसाठी फिक्स झाले आहेत.

1. ऑस्ट्रेलिया

6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकत ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 10 गुण आहेत. मात्र त्याचे पुढील सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात होणार आहेत.

2. भारत

भारतीय संघ सध्या 7 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. खास गोष्ट म्हणजे भारताचे दिग्गज संघांविरोधातले सामने झाले आहे. भारताचे पुढील सामने हे बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल.

Loading...

3. इंग्लंड

यजमान इंग्लंडचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडनं 5 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. गुणतालिकेत इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

4. न्यूझीलंड

दक्षिण आफ्रिकेविरोधात धमाकेदार विजयानंतर न्यूझीलंडचा संघ सध्या चांगल्या तेजीत आहे. 5 पैकी 4 सामने जिंकत त्यांनी आपले सेमीफायनलचे तिकीट फिक्स केले आहे.

9 आणि 11 जुलैला होणार सेमीफायनल

वर्ल्ड कपमध्ये सध्या लीग स्टेजचे सामने सुरु आहेत. त्यानंतर 9 जुलैपासून नॉक आऊट सामने सुरु होती. पहिला सेमीफायनल सामना 9 जुलैला मॅंचेस्टरमध्ये होईल तर दुसरा सामना 11 जुलैला बर्मिंघममध्ये होईल. अंतिम सामना 14 जुलै रोजी लॉर्डसवर होणार आहे.

भारताचा प्रवास सोपा

भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यातील एक सामना पावसामुळं रद्द झाला त्यामुळं भारताकडे आता 7 गुण आहेत. भारताचे पुढील सामने हे बांगलादेश, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. यातील इंग्लंड विरुद्धचा सामना भारतासाठी कठिण असेल. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवलं आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावासामुळं रद्द झाला. त्यामुळं भारतानं आता बाकीचे सामने जिंकल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.

वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट

वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल

वाचा- ...म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला

सानियासाठी 'रावळपिंडी एक्स्प्रेस' उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...