World Cup : हजारो क्रिकेटपटू खेळले पण एकालाच मिळाला 'हा' मान

ICC Cricket World Cup History : व्हिवियन रिचर्डस, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं पण फक्त एकाच खेळाडूला असा मान मिळाला.

  • Share this:

आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरुवात झाली. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना झाला. यात आफ्रिकेच्या ताहिरने पहिल्याच षटकात इंग्लंडला दणका दिला. पहिलं षटक टाकणारा तो वर्ल्ड कपच्या इतिहासातला पहिला फिरकीपटू ठरला आहे.

वर्ल्ड कपचा हा 12 वा हंगाम असून 44 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत पहिलं षटक फिरकीपटूने कधीच टाकलं नव्हतं. जाणून घेऊया वर्ल्ड कपमधील पहिल्या चेंडू टाकणाऱ्या आणि फलंदाजी कोणी केली होती याबद्दल...

पहिला वर्ल्ड कप 1975 ला इंग्लंडमध्ये खेळण्यात आला होता. या सामन्यातील पहिली लढत भारत आणि इंग्लंड यांच्यात झाली होती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन जेम्सनला भारताच्या मदन लालने पहिला चेंडू टाकला होता.

1979 मध्ये दुसरा वर्ल्ड कपही इंग्लंडमध्येच झाला होता. यात वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात पहिला सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात पहिला चेंडू वेस्ट इंडिजच्या अॅन्डी रॉबर्टसने सुनील गावस्कर यांना टाकला होता.

भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला त्या वर्षी 1983 ला पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडलीने ग्रॅम फोवरला पहिला चेंडू टाकला.

1987 ला खेळण्यात आलेला वर्ल्ड कप हा पहिल्यांदा इंग्लंडबाहेर झाला होता. यातील पहिला सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रंगला. लंकेच्या विमोथनने रमीज राजाला पहिला चेंडू टाकला होता.

1992 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिली लढत झाली. यात क्रेग मॅक्डरमटने न्यूझीलंडच्या जॉन राईटला पहिला चेंडू टाकला होता. याच चेंडूवर जॉन राइट बाद झाला होता.

1996 मध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडच्या डॉमिनिक कॉर्कने न्यूझीलंडच्या क्रेग स्पियरमॅनला पहिला चेंडू टाकला होता.

1999 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. यात लंकेच्या सनथ जयसुर्याला इंग्लंडच्या डॅरेन गॉफने पहिला चेंडू टाकला होता.

2003 मध्ये दक्षिण दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात वर्ल्ड कपमधील पहिला सामना झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉकने ख्रिस गेलला पहिला चेंडू टाकला होता.

2007 च्या वर्ल्ड कपची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सामन्याने झाली होती. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा ख्रिस गेल पहिला चेंडू खेळला असा मान पटकावलेला तो एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात  पाकिस्तानच्या उमर गुलने पहिलं षटक टाकलं होतं.

2011 चा वर्ल्ड कप भारतात खेळण्यात आला होता. या वर्ल्ड कपची सुरुवात बांगलादेश विरुद्ध भारत यांच्या सामन्याने झाली होती. बांगलादेशच्या सैफुल इस्लामने विरेंद्र सेहवागला पहिला चेंडू टाकला होता.

2015 मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपची सुरुवात झाली होती. लंकेच्या नुवान कुलशेखराने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला पहिला चेंडू टाकला होता.

यंदाच्या वर्ल्ड कपची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने झाली. यात इम्रान ताहिरने दुसऱ्याच चेंडूवर जेसन रॉयला बाद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2019 09:30 PM IST

ताज्या बातम्या