अष्टपैलू खेळाडू सलामीला पाठवा, मागणीसाठी झाडावर चढून बसला चाहता

अष्टपैलू खेळाडू सलामीला पाठवा, मागणीसाठी झाडावर चढून बसला चाहता

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला सलामीला खेळण्यासाठी पाठवण्याची मागणी एका चाहत्यानं केली आहे.

  • Share this:

कोलंबो, 04 जून : खेळ कोणताही असो चाहते कधी काय करतील सांगता येत नाही. सध्या जगभरात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा ज्वर चढला आहे. दरम्यान  श्रीलंकेतील एका चाहत्यानं तर हद्दच पार केली. त्यानं लंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराला वरच्या क्रमावर पाठवावं याची मागणी केली. या मागणीसाठी त्याने झाडावर चढून बसण्याचा मार्ग निवडला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर आता अफगाणिस्तनविरुद्धच्या सामन्यात लंकेनं थिसारा परेराला ओपनिंगला पाठवावं असं या चाहत्यानं म्हटंल आहे. त्याच्या या मागणीने लंकेचा माजी क्रिकेटपटू रसल अर्नोल्ड प्रभावित झाल्याचं दिसतं. त्यांनी या चाहत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अर्नोल्डने म्हटंल आहे की, गजब.. त्याला वरतीच बसवून ठेवा. सध्या लंकेचा संघ फारच कमकूवत आहे. गेल्या एक वर्षांत या संघाला मालिका विजय मिळवण्यात अपयश आलं आहे. तसेच अनेक प्रयोगही संघात करण्यात आले. वर्ल्ड कपसाठी दिमुथ करुणारत्नेला कर्णधार करण्यात आलं आहे. त्याने चार वर्षांपूर्वी लंकेसाठी एकदिवसीय सामना खेळला होता.

लंकेची वर्ल्ड कपमधील सुरुवातही निराशाजनक अशी झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लंकेला 150 धावाही करता आल्या नाहीत. त्यानंतर न्यूझीलंडने 10 विकेटनं विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात लंकेची अफगाणिस्तानविरुद्ध लढत होणार आहे. दोन्ही संघात आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने झाले आहेत. यातील दोन लंकेनं तर एक अफगाणिस्तानने जिंकला आहे.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू

CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी

First published: June 4, 2019, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading