नो बॉल बुमराहचा अन् स्टार झाला पाकिस्तानी फलंदाज

पाकिस्तानच्या तडाखेबाज फलंदाजाने बुमराहमुळे आपण स्टार झाल्याचं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 09:29 AM IST

नो बॉल बुमराहचा अन् स्टार झाला पाकिस्तानी फलंदाज

पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने नुकताच एक खुलासा केला. जसप्रीत बुमराहच्या नो बॉलने त्याला स्टार केलं. दोन वर्षांपूर्वी आय़सीसी चॅम्पियन ट्रॉफीत घडलेला किस्सा फखर जमानने सांगितला. फखर जमानवर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार आहे. नौदलातून क्रिकेटमध्ये आलेल्या या खेळाडूवर आता पाकिस्तानची भिस्त आहे.

इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी फखर जमानने एका मुलाखतीत आपल्या फलंदाजीबद्दल सांगितलं. दोन वर्षांपूर्वी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर जमान आउट झाला होता पण तो नो बॉल होता. या जीवदानाचा जमानने पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर फखर जमानने शतकी खेळी केली होती. त्याच्या जोरावर पाकिस्तानने सामना जिंकला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर फखर जमानने मागे वळून पाहिलं नाही. त्याने म्हटलं की, बुमराहच्या नो बॉलने मला स्टार केलं. विशेष म्हणजे मी फायनलच्या आधी स्वप्नातही नो ब़ॉलवर बाद झाल्याचं पाहिलं होतं आणि तसंच घडलं.

Loading...

पाकिस्तानला 1992 नंतर पुन्हा वर्ल्ड कप जिंकून द्यायचा आहे. मला माझ्या जबाबदारीची जाणीव असून वर्ल्ड कपला माझे प्राधान्य असेल असंही फखर जमानने म्हटलं आहे.

फखर जमानला सोल्जर म्हटलं जातं. त्याने झिम्बॉम्बेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतकही केलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज आहे.

फखर जमानची पाकिस्तानच्या संघात निवड होण्याचा किस्सासुद्धा मजेदार आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सलामीवर शरजील खान स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला आणि त्याच्यावर बंदी घातली. त्याच्या जाग्यावर फखर जमानला संधी मिळाली आणि त्याचं सोनं करण्यात फखरने वेळ लावला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...